शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडातील चौक वडापने घेरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST

कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस ...

कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस तैनात असतानाही रिक्षा अस्ताव्यस्त लावल्या जात असून, वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या शहरातील चौक वडापने घेरल्याचे दिसत आहे.

शहरातील कर्मवीर चौक, दत्त चौकासह भेदा चौकात काही रिक्षा चालकांकडून रिक्षा मुद्दाम आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली तर त्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत. पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बसस्थानक परिसरात बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा दंडुका हाती घेणे गरजेचे आहे. बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा प्रवासी ये-जा करण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. मात्र, स्वत:च्या वाहनाने, दुचाकीने बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अशा विविध मार्गांनी येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी दररोज अस्ताव्यस्त उभ्या होणाऱ्या रिक्षांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या परिसरातील रिक्षा व्यावसायिकांचाही उद्योग अशाच प्रकारे चालला आहे.

मलकापूर परिसरात जाणाऱ्या रिक्षा तर त्यांचा थांबा सोडून रस्त्यावरच प्रवाशांना घेतात. त्याचबरोबर पुतळ्यासमोर असलेल्या रिक्षा थांब्यावर अनेकदा रिक्षांच्या दोन-दोन रांगा केल्या जातात. तेथेच सिग्नलही असल्याने या सर्व रिक्षांचा अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- चौकट

वाहतूक पोलिसांसमोर मनमानी

वाहतूक पोलिसांसमोरच हा प्रकार घडत असताना त्यांच्याकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता बसस्थानकाबाहेरील बिघडलेल्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चौकट

पादचारी मार्गालगत यांचीच सत्ता

कऱ्हाड शहरातील बसस्थानक परिसरातील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनेक व्यावसायिकांनी पादचारी मार्गावरच आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यातच फूटपाथला घासून वडापची वाहने उभी केली जात असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

फोटो : २७केआरडी०३

कॅप्शन : जिजामातानगर - विमानतळ, ता. कऱ्हाड येथे जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.