यावेळी माणिकराव पाटील, तानाजीराव जाधव, नंदकुमार मोरे, लालासाहेब पाटील, डी. बी. जाधव, संजय थोरात, कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड, शाखा अभियंता जावेद इनामदार, अरविंद जाधव, भानुदास जाधव, सरपंच सुरेखा जाधव, संतोष जाधव, गणेश भोज उपस्थित होते.
धनगरवाडी-हणबरवाडी या योजनेचे काम वेगाने सुरू आहे. या योजनेखाली येणाऱ्या सतरा गावांमधील २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दरम्यान, योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने सुरू आहे. या योजनेसाठी २०२१ च्या अर्थसंकल्पात ३५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित निधीसाठी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. गत वीस वर्षांपासून या पाणी उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी या योजनेसाठीचा संकल्प मांडला होता. तेव्हापासून या योजनेसाठीचा पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश मिळाले असून योजना लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
फोटो : २२केआरडी०४
कॅप्शन :
पाडळी, ता. कऱ्हाड येथे धनगरवाडी- हणबरवाडी योजनेच्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.