शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कंग्राळकरांविरुध्दच्या कारवाईला गती

By admin | Updated: July 28, 2014 23:21 IST

अवैध उत्खनन :प्रांतांकडून अपिलावर आदेश नाही; तहसीलदार पुढील कार्यवाहीसाठी सज्ज

सातारा : अवैध मुरूम उत्खननाबाबत तहसीलदारांनी काढलेल्या आदेशानुसार दिलेल्या मुदतीत बिल्डर श्रीधर कंग्राळकर यांनी दंड भरला नाही. कंग्राळकरांनी केलेल्या अपिलाबाबतही प्रांताधिकाऱ्यांनी कुठलाही आदेश काढला नसल्याने तहसीलदार राजेश चव्हाण यांनी पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कंग्राळकरांना दंड वसुलीची पहिली नोटीस धाडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केल्याचे उघड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामा करून त्यांना तब्बल २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसीची मुदत सोमवारी (दि.२८) संपली. कंग्राळकरांनी या मुदतीत हा दंड भरलेला नाही. तहसीलदारांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. या अपिलाबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार कारवाई सुरू केली आहे. कंग्राळकरांनी झालेला दंड सात दिवसांच्या आत शासकीय तिजोरीत भरावा, अशी सूचना करणारी नोटीस धाडण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.२९) रोजी ईदनिमित्त शासकीय सुटी असल्याने बुधवारी (दि.३०) कायद्यानुसार पहिली नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कंग्राळकरांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने तक्रारदार व दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी सोमवारी (२८) प्रांताधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले. ‘या प्रकरणातील अपिलावर सुनावणी घेताना माझे तोंडी व लेखी म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय अथवा स्थगिती देऊ नये, यासंदर्भात आवश्यक ती लेखी अथवा तोंडी कायदेशीर पुरावा देण्याचा हक्क कायम ठेवून हा अर्ज रेकॉर्डवर ठेवावा व अपिलाचे मला लेखी कळावे,’अशी लेखी विनंती सुशांत मोरे यांनी प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे. त्यामुळे प्रशासनाने कंग्राळकर यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.सुशांत मोरे यांनी लेखी निवेदन दिले असून, ‘आपले ठेवायचे झाकून...’, अशी प्रवृत्ती असणाऱ्यांनी खोटे आरोप करू नयेत.’ असा टोला बिल्डरला हाणला आहे. (प्रतिनिधी)