शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

दक्षिण दरवाज्याचे रूप खुलले !

By admin | Updated: December 19, 2015 01:05 IST

अजिंक्यतारा किल्ला : तब्बल अडीच टनांच्या प्रवेशद्वारासाठी एक महिना काम चालू

सातारा : अनेक पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या ऐतिहासिक ‘अजिंक्यतारा’ किल्ल्यावर शुक्रवारी आणखी एक ऐतिहासिक घटना घडली. किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या प्रवेशद्वारावर तब्बल अडीच टन वजनाचा नवा पोलादी दरवाजा झळकला. साताऱ्यातील एका कलाकाराच्या अनोख्या अदाकारीने हा दक्षिण दरवाजा पुरता हरखून गेला. ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला आहे. मात्र, पूर्वी संकटकाळात शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी दक्षिण दिशेचा दरवाजा वापरला जायचा. मंगळाईदेवी मंदिराच्या जवळून या दक्षिण दरवाजाकडे आजही जाता येते. मात्र, याठिकाणी निसरडी वाट असल्याने ५०० फुटांपेक्षाही जास्त खोल दरी कोसळण्याची शक्यता होती. रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या दक्षिण दरवाज्याची दुर्दशा खटकत होती. एकदा ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या कानावर टाकली. तेव्हा पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी बोलून दक्षिण दरवाजाचे रूप पालटविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, शहर अभियंता चिद्रे, तत्कालीन उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, यांच्यासह अनेकांनी या दरवाजाच्या नक्षीकामाबाबत चर्चा केली. गोडोलीतील भद्रकाली इंडस्ट्रीजचे विद्याधर कांबळी यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले. सुमारे २० बाय १० फूट आकाराचा हा दरवाजा पोलादातून बनविण्याचे ठरविण्यात आले. दरवाजाचा ऐतिहासिक बाज कायम राहावा, यासाठी विद्याधर यांनी शनिवार वाड्याचे दरवाजे दोन दिवस न्याहाळले. राजस्थानातील किल्ल्यांच्या दरवाजांचीही त्यांनी बारीकसारीक माहिती घेतली. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली. तब्बल महिनाभर हा दरवाजा तयार करण्याचे काम सुरु होते. किल्ल्याच्या दक्षिणेला पाऊस जास्त प्रमाणात असल्याने या दरवाजाला विशेष कोटिंगही करण्यात आले. शुक्रवारी हा दक्षिण दरवाजा सातारकरांना दर्शन देण्यासाठी पूर्णपणे उभा राहिला आहे. विशेष म्हणजे या दरवाजाकडे जाण्यासाठी पायऱ्यांचेही बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे हा दरवाजा पाहण्यासाठी कोणालाही अगदी सहजपणे जाता येणे शक्य झाले आहे.