शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांच्या व्यथा!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 00:58 IST

कऱ्हाड उत्तर मतदारसंघ : विद्या ठाकूर यांनी साधला संवाद; धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना पूर्ण करण्याची मागणी

मसूर : कऱ्हाड उत्तर मतदार संघाच्या पूर्व भागातील दहा गावांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या दुष्काळी दौऱ्यात गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी, शेती, वीज व रस्ते यासह दुष्काळी भीषणता पोटतिडकीने मांडली. याशिवाय या भागाचा दुष्काळ संपविण्यासाठी धनगरवाडी-हणबवाडी ही रखडलेली पाणी योजना तत्काळ पूर्णत्वास नेण्याची एकमुखी जोरदार मागणी केली. दरम्यान, ‘या दुष्काळी सर्वच गावांच्या प्रमुख मागण्या व समस्यांचा अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. याबद्दल सकारात्मक पाठपुरावा करणार आहे,’ असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी दुष्काळी जनतेस दिला. कऱ्हाड पूर्व भागातील मसूर, किवळ, खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, पाडळी, गोसावेवाडी या भागाचा दौरा मंत्री ठाकूर यांनी केला.यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे, तालुका कृषी अधिकारी खरात, आरफळ कालव्याचे शाखा अभियंता नांगरे, लघू पाटबंधारे विभागाचे सुरवसे, भाजपचे विक्रम पावस्कर, रामकृष्ण वेताळ, विश्वास सावंत, कऱ्हाड उत्तर दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद कुंभार, सदस्य सूर्यकांत पडवळ, प्रशांत देशमुख, छाया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री ठाकूर म्हणाल्या, ‘राज्यात दुष्काळाची तीव्रता आहे. त्यासाठी शासनाने दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजनांसाठी दुष्काळी दौरे आयोजित केले आहेत. कऱ्हाड उत्तर पूर्व भागाला दुष्काळाचे चटके बसत आहेत.येथे पिण्याचे व शेतीच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे. यासाठी या दुष्काळी दौऱ्यात शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही. अधिकारी वर्ग विविध शासकीय योजनांचा लाभ देतात की नाही.दिलेल्या निधीचा योग्य वापर होतो का यासह दुष्काळी भागतील गावांच्या नेमक्या काय समस्या आहेत. तेथे काय करणे गरजेचे आहे. यासाठी या दुष्काळी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)