शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य दलातील जवानाने धावत्या ट्रेनमधून मुलीला फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

सातारा : एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार आदर्की ...

सातारा : एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडला. यामध्ये मुलगी जखमी झाली आहे. संशयितास रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली असून प्रभु मल्लाप्पा उपहार (वय ३३, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव, कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सैन्यदलात झांसी येथे कार्यरत आहे.

याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस गोव्यावरून सुटल्यानंतर मंगळवारी रात्री दीड वाजता साताऱ्यापासून पुढे लोणंदला गेली. या रेल्वेच्या एस-७ डब्यात एक कुटुंब प्रवास करत होते. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगी बर्थवर झोपली होती. संशयिताने मुलीस झोपेतच उचलून बाथरुममध्ये नेले. बाथरुमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलीस जाग आली. तिने आरडाओरडा सुरू केला. तिने आरोपीला लाथा मारल्या. लाथा मारल्यानंतर आरोपीने मुलीस रडू नको, आई-वडिलांकडे सोडतो, असे सांगितले व तिला बाथरुमच्या बाहेर घेऊन आला. यानंतर संशयिताने अचानक दरवाजा उघडून मुलीस ट्रेनच्या बाहेर फेकून दिले. याचवेळी रेल्वेने आदर्की स्टेशन ओलांडून घाटरस्ता सुरू झाला होता. यामुळे ट्रेनचा वेग ताशी २० किमी इतका कमी होता. त्यामुळे मुलगी ट्रेनमधून पडली तरी तिला गंभीर इजा झाली नाही. मुलगी पायावर पडल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच तिच्या हनुवटी व हाताला जखमा झाल्या. ती तेथे पडल्याचे सकाळी गावातील स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिने खरी हकीकत सांगितली. तेव्हा ही घटना धावत्या रेल्वेच्या डब्यात घडली असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल केली. महाराष्ट्र राज्य लोहमार्गच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी रेल्वेच्या बोगी पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश दिले. जेणेकरून आरोपी पळून जाऊ नये. त्यानुसार रेल्वेेचे सर्व डबे ब्लॉक करण्यात आले. दरम्यान, लोणंदपासून जळगाव-भुसावळपर्यंत ट्रेनमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एकूण ३०० ते ४०० पोलीस कॉन्स्टेबल तसेच रेल्वे कर्मचारी चढवले गेले. मुलीने दिलेल्या वर्णनानुसार जवळपास २५ व्यक्तींची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली. त्यातून चारजणांना ताब्यात घेतले. या चौघातून मूळ संशयिताची ओळख पटली. त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याची पोलिसी खाक्या दाखवताच कबुली दिली. त्याचा फोटो व्हॉटसॲपवरून सातारा येथे पोलिसांना पाठवला. तो फोटो पीडित मुलीस दाखवला असता मुलीने संशयितास ओळखताच संबंधितास पोलिसांनी भुसावळ येथे अटक केली.

संशयित आरोपी प्रभू उपहार हा सैन्यदलामध्ये नाईक या पदावर काम करतोय. त्याने केलेल्या या घृणास्पद प्रकाराने समाजमन हेलावून गेले आहे. कडक कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

चौकट: रेल्वे अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन जखमी मुलीची विचारपूस केली. सेेेंट्रल रेल्वेचे पोलीस दलाचा रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे पोलीस तसेच टीसी या डब्यात हजर असणे गरजेचे होते. तथापि, भविष्यात याबाबत योग्य ती अंमलबजावणी करणार असल्याचेही रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.