शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांच्या पाठ्यपुस्तकांत सामावली सातारी गाणी- लोकमत विशेष...

By admin | Updated: July 29, 2014 22:57 IST

दोन कविता अभ्यासक्रमात : बालचित्रवाणीने कलाशिक्षकांसाठी तयार केलेल्या सीडीतही सातारच्या अध्यापकाने लिहिलेल्या दोन प्रार्थना

राजीव मुळ्ये - सातारा  ,, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर यांच्या कविता पाठ्यपुस्तकात शिकताना लहानपणी ते भारावले होते. आज अशा दिग्गज कवींच्या जोडीने त्यांच्याच कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाल्याचे पाहून ते कृतकृत्य झाले आहेत. दुसरी आणि चौथीसाठीच्या कलाशिक्षण विभागाच्या पाठ्यपुस्तकात ज्या सातारकर शिक्षकाच्या कविता समाविष्ट झाल्यात, त्यांचे नाव आहे मोहन रामचंद्र बेदरकर.बेदरकर यांनी तब्बल २९ वर्षे सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृत विषयाचे अध्यापन केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्यातील शिक्षक त्यांना अस्वस्थ करीत राहिला आणि गेल्या दोन वर्षांपासून गुरुकुल स्कूलमध्ये ते विद्यार्थ्यांना घडवीत आहेत. कविमनाचे अध्यापक बेदरकर यांच्या कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट होऊन दोन वर्षे झाली तरी ही गोष्ट लपूनच राहिली. याची माहिती मिळताच ‘लोकमत’ने याविषयी सविस्तर जाणून घेतले. एक स्वरचित कवितासंग्रह त्यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला अर्थातच विद्या परिषदेला पाठविला होता. ही संस्था राज्यात शैक्षणिक प्रकल्प तयार करण्याचे काम करते. परंतु अभ्यासक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे असते. या मंडळापर्यंत बेदरकर यांच्या कविता पोहोचल्या. याच मंडळाचा स्वतंत्र कलाशिक्षण विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून राज्यातील सर्व कलाशिक्षकांना पाच प्रकारच्या कलांविषयी अवगत करण्यात येते. या विभागाने बेदरकर यांच्या   दोनरचना पाठ्यपुस्तकासाठी निवडल्या. जय शारदे, जय शारदेहो प्रसन्न मज वरदान दे असे ध्रुवपद असणारी प्रार्थना दुसरीच्या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आली. चौथीच्या अभ्यासक्रमासाठी बेदरकर यांनी लिहिलेल्या कोळीगीताची निवड झाली.डोलकरा रे डोलकरातुफान आयलंय समिंदराभरारा सुटलाय वाराअसे या कोळीगीताचे शब्द आहेत. या व्यतिरिक्त कलाशिक्षकांसाठी बालचित्रवाणीच्या माध्यमातून एक सीेडी तयार करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व शाळांतील कलाशिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रमात ही सीडी देण्यात येते. या सीडीतही बेदरकर यांनी लिहिलेल्या दोन मराठी प्रार्थनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या सीडीत हिंदी प्रार्थना, लोकगीते, निसर्गगीतांचा समावेश असून, या गीतांच्या पुस्तकात कलाशिक्षकांसाठी गाण्यांचे ‘नोटेशन’ दिलेले आहे. त्यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना गाण्यांच्या चाली शिकवू शकतात.बेदरकर यांची निवड कलाशिक्षण विभागाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत ‘समीक्षक’ म्हणून करण्यात आली आहे. पुस्तकाचा कच्चा मसुदा तयार झाल्यानंतर प्रत्येक पाठ उद्दिष्टानुसार झाला आहे की नाही, याचे मूल्यमापन राज्यभरातून नियुक्त केलेल्या समीक्षकांकडून केले जाते. पाठातील माहिती परिपूर्ण आहे की आणखी काही हवे आहे? एखादा भाग वगळण्याजोगा आहे का? असेल तर कारण काय, हे सांगण्याचे काम समीक्षकांचे असते.राज्यभरातील क्रीडाशिक्षकांसाठी बालचित्रवाणीच्या माध्यमातून ‘गीतावली’ ही सीडी तयार करण्यात आली असून, त्यातील बेदरकर यांच्या रचना सातारचेच संगीतशिक्षक दत्तात्रय डोईफोडे यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.