शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

औंधसह सोळा गावे आक्रमक

By admin | Updated: July 28, 2014 23:26 IST

पाणीप्रश्न : गोरे यांच्या निवासस्थानी करणार उपोषण

सातारा : औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी दि. ५ आॅगस्टपासून माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय राजवैभव प्रतिष्ठानने घेतला आहे. औंधसह सोळा गावांची कोअर कमिटीची बैठक औंध येथील दत्त मंदिरात झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री सातारा जिल्ह्यातील असतानाही औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊनही जर शासकीय बैठक होत नसेल तर ते गंभीर आहे. सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींनी शेतीचे पाणी पळविले. तरीही दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांकडे पाहण्यासाठी राजकीय मंडळींना वेळ नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. काही. लोकप्रतिनिधी औंधसह सोळा गावांना ब्रह्मपुरी योजनेचे पाणी देणार असल्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ही योजना फक्त चारमाही आहे. त्यामुळे उर्वरित आठ महिन्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा आक्षेपही यावेळी घेण्यात आला. सोळशी धरणात खटाव तालुक्याचा समावेश होत नाही. त्यामुळे औंधसह सोळा गावांना उरमोडी योजनेतून १.०९ टीएमसी पाणी ठिबक सिंचनद्वारे देता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी माण आणि खटाव तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ही बैठक दि. ४ आॅगस्टपूर्वी नाही झाली तर सोळा गावांतील प्रमुख १६० प्रतिनिधी या आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.’यावेळी दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ घार्गे, प्रा. रामचंद्र साळुंखे, जयवंत खराडे, नवल थोरात, शशिकांत जाधव, प्रभाकर देशमुख, जितेंद्र फडतरे, सुनील सूर्यवंशी, पृथ्वीराज भोकरे, जालिंदर राऊत, श्रीमंत देशमुख, जयसिंग घार्गे, महादेव देशमुख, हंबीरराव देशमुख, अर्जून देशमुख, भानुदास माळी, भिकू पवार, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)