शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

जावेद दस्तगीर महाबरी (वय २७, रा. आटके, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...

जावेद दस्तगीर महाबरी (वय २७, रा. आटके, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहरासह ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांनी उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्ह्यांचा गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांनीही याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित केले होते. त्यानुसार नांदगाव दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक राजू डांगे, सहायक फौजदार भाऊसाहेब तांदळे, हवालदार विकास सपकाळ, ज्ञानदेव राजे, सचिन गुरव, आशिष पाटील हे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना जावेद महाबरी याचे नाव समोर आले. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने नारायणवाडी, मलकापूर येथून सहा दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. तसेच त्याला अटकही करण्यात आली. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार विकास सपकाळ तपास करीत आहेत.