शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आठपैकी सहा जागांवर भाजप-सेनेचं ‘उदक’?

By admin | Updated: July 29, 2014 22:56 IST

विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात ‘स्वाभिमानी, रासप अन् रिपाइं’ आक्रमक

सातारा : काँग्रेस अन् राष्ट्रवादीचा ‘साखरपट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात भाजप-सेनेचं स्थान तसं पूर्वीपासूनच नगण्य. मात्र, यंदा मोदी लाटेत चमत्कार घडण्याची शक्यता लक्षात आल्यानं इथल्या भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये ‘जान’ आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीचं साम्राज्य मोडीत काढण्यासाठी ही मंडळी आसुसलेली असतानाच ‘स्वाभिमानी, रासप अन् रिपाइं’च्या दाव्यामुळं भाजप-सेना कार्यकर्त्यांसमोर ‘आता कसं?’ असा प्रश्न आ वासून उभा ठाकलाय, कारण जिल्ह्यात आठपैकी तब्बल सहा विधानसभा मतदार संघांवर महायुतीतील इतर तीन पक्षांनी आपला अधिकार सांगितलाय.कुणाचा कुठे दावा!-माण-खटाव : रासप, स्वाभिमानी -फलटण : रासप, स्वाभिमानी-वाई : रिपाइं-सातारा : जैसे थे ( भाजप)-कोरेगाव : स्वाभिमानी -पाटण : भाजप-कऱ्हाड उत्तर : स्वाभिमानी-कऱ्हाड दक्षिण : स्वाभिमानी‘फलटण’वर स्वाभिमानीचा दावा फलटण : फलटण राखीव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी विरोधी पक्षातर्फे मोठ्या संख्येने अनेक जण इच्छुक असून महायुतीत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी स्वाभिमानी पक्ष प्रयत्न करीत आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला तर युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे.मात्र, स्वाभिमानीने आपला दावा केला आहे. शिवसेनेतर्फे बाबूराव माने यांचा प्रचार सध्या सुरू असला तरी ते बाहेरचे उमेदवार असल्याने आम्हाला जागा द्यावी, असा दावा स्वाभिमानी करीत आहे.कऱ्हाड : जिल्ह्याने शिवसेनेला दोन आमदार दिले. त्यापैकी एक पाटणने. त्यामुळे पाटणमध्ये भगवा फडकविणाऱ्या ‘शंभूराज’च्या खांद्यावरील भगवा काढून घेण्याचा विचार किंवा तेथे स्वतंत्र कमळ फुलविण्याचा विचार कोणी करेल, असे सध्यातरी वाटत नाही. शिवाय महायुतीत असणाऱ्या इतर कोणत्याही पक्षाची तेवढी तयारीही तेथे जाणवत नाही. पाटणच राजकारण सतत देसाई आणी पाटणकर गटाभोवतीच फिरताना दिसतेय. पण १९९९ च्या विधानसभेत लोकनेत्यांचे नातू शंभूराज देसाई यांनी खांद्यावर चक्क भगवा झेंडा घेतला आणि तालुक्यात शिवसेनेला उभारी मिळाली; पण २००९ च्या निवडणुकीत त्यांना विजयी पताका कायम ठेवता आली नाही. तरीही, ‘शंभूराज’नी तर गत निवडणुकीत पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केली आहे. निसटता पराभव होऊनही पक्षाकडून पुरेशी दखल घेतली न गेल्याने त्यांची नाराजी होती . पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेना अथवा महायुतीतील इतर घटक पक्षांकडून कोणीही प्रबळ दावेदार दिसत नाही. भाजपाचे अ‍ॅड. भरत पाटील पाटण तालुक्याचे असले तरी त्यांनी कऱ्हाड दक्षिणच मैदान यापूर्वीच निवडलंय. वाई : पूर्वीच्या वाई-खंडाळा मतदार संघास २००९ पासून महाबळेश्वर जोडले गेल्याने हा मतदारसंघ मोठा झाला आहे. लोकसभेत महायुती झाली. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेला जागा मिळणार की आरपीआय, भाजपा यावर हक्क सांगणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ‘लोकसभेत ‘रिपाइं’ला जागा दिली; पण शिवसेना-भाजपा नेत्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. शिवसेनेचा बंडखोर उमेदवार उभा राहिला. मात्र, आता ‘आम्हीही र्इंट का जवाब पत्थर से’ देणार असून युतीचे काम करणार नाही. आमच्या विचारांच्या घटकांना घेऊन निवडणूक लढणार असल्याचे ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.