शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

By admin | Updated: December 14, 2014 23:51 IST

चित्ररथांनी वेधले कऱ्हाडकरांचे लक्ष : दोन हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग

कऱ्हाड : गेली १७ वर्षे कऱ्हाडात अविरतपणे सुरू असणाऱ्या ‘विजय दिवस’ समारोहास रविवारी भव्य शोभायात्रेने प्रारंभ झाला़ बँड, झांजपथक, लेझीम पथक आदी वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेतील चित्ररथांनी कऱ्हाडकरांचे लक्ष वेधून घेतले़ भारतीय सैन्यदलाच्या बांगलामुक्ती संग्रामाच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने कऱ्हाडात प्रतिवर्षी ‘विजय दिवस’ समारोह साजरा करण्यात येतो़ त्याचाच भाग म्हणून १४ ते १६ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ रविवारी सकाळी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शहरातून शोभायात्रेस प्रारंभ झाला़ यावेळी कऱ्हाड अर्बनचे अध्यक्ष डॉ़ सुभाष एरम, नगराध्यक्षा अ‍ॅड़ विद्या साळुंखे, तहसीलदार सुधाकर भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी़ आऱ पाटील, दिलीप चव्हाण, विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष शंकराप्पा संसुद्दी, सचिव अ‍ॅड़ संभाजी मोहिते, सहसचिव टी़ डी़ कुंभार, विनायक विभुते, अ‍ॅड़ परवेज सुतार, जी़ आऱ कणसे, रत्नाकर शानभाग यांची प्रमुख उपस्थिती होती़ शोभायात्रेत टिळक हायस्कूल, लाहोटी कन्या प्रशाला, टिळक कनिष्ठ महाविद्यालय, महिला महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, विठामाता विद्यालय, यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, पालकर माध्यमिक विद्यालय, विवेकानंद चित्रकला महाविद्यालय, शाहिन हायस्कूल व आत्माराम विद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा सहभाग होता़ टिळक व आत्माराम विद्यालयाचे झांजपथक, लाहोटी कन्याशाळेचे बँड पथक, यशवंत हायस्कूलचे स्काऊट गाईड पथकासह, टिळक कनिष्ठ महाविद्यालयातील, वेगवेगळ्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिंनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या़ शोभायात्रेत १२ चित्ररथ सहभागी झाले होते़ भारतीय पारंपरिक लोककला स्वच्छ भारत, सुंदर भारत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, मंगळावरील स्वारी आदी विषयावरील चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरले़ शहरातील मुख्य रस्त्यावरून तीन तास ही शोभायात्रा निघाली़ याच्या यशस्वितेसाठी संयोजक प्रमुख जी़ आऱ कणसे, अध्यक्ष रत्नाकर शानभाग यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)कऱ्हाड येथे आयोजित ‘विजय दिवस’ समारोहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मराठा बटालियनच्या जवानांनी मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाचा सराव केला. कऱ्हाड येथे ‘विजय दिवस’ समारोहाच्या मुख्य सोहळ्यात अनेक चित्तथरारक कसरती सादर केल्या जातात. या कसरतींचा रविवारी अनेकांनी सराव केला. कऱ्हाड येथे रविवारी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संचलनाचा सराव करण्यात आला.