शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

सातारा : ‘सातारा पालिकेची आगामी निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टिकोनातून पक्ष पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणार ...

सातारा : ‘सातारा पालिकेची आगामी निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टिकोनातून पक्ष पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणार असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या पदाधिकारी यांच्याकडे सांगाव्यात. नक्कीच त्या सर्व सोडविल्या जातील,’ असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

सातारा नगरपालिका आगामी निवडणुकीसंदर्भात सातारा शहर शिवसेना सर्व आजी माजी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक दैवज्ञ भवन मंगल कार्यालय सातारा येथे पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क नेते दिवाकर रावते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आजची ही बैठक आयोजित करण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी नगरपालिकेतील शेवटच्या मतदारापर्यंत संपर्क करून शिवसेना सरकारची व मुख्यमंत्री यांची विकासकामे पोहोचवावीत, असेही नितीन बानुगडे पाटील यांनी या वेळी सांगितले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरच वॉर्डनिहाय बैठका घेऊन पुढील रणनीती ठरविणार असे सांगितले.

प्रसंगी तालुकाप्रमुख अनिल गुजर, आतिश ननावरे, शहरप्रमुख निलेश मोरे, महिला शहर संघटिका रूपा लेंबे, युवा सेना अधिकारी महेश शिर्के, शिवाजी पवार, प्रणव सावंत, मारुती वाघमारे, सयाजी शिंदे, मंजिरी सावंत, रमेश बोराटे, प्रशांत शेळके, मोहन इंगळे, संतोष शिंदे, नीलेश चित्रागार, सागर रायते, इम्रान बागवान, अक्षय जमदाडे, सपकाळ दादा, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथे शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांचा नीलेश मोरे यांनी सत्कार केला. याप्रसंगी सचिन मोहिते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो नेम : ०२शिवसेना