शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंवरील ‘अविश्वास’ नामंजूर

By admin | Updated: July 31, 2016 00:03 IST

जिल्हा परिषद : बालेकिल्ल्यात राष्ट्र्रवादीला काँग्रेसची चपराक

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीनेच अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादीचे केवळ ३६ सदस्यच उपस्थित राहिले. तसेच खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे तीन सदस्य आणि काँग्रेस सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर केला. दरम्यान, अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला कोंडीत पकडून काँग्रेसने मोठी चपराक दिली आहे. अविश्वास ठराव जिंकता न आल्याने राष्ट्रवादीवर नाचक्की ओढावली असून, बालेकिल्ल्यात अस्वस्थता पसरली आहे. यावेळी शिवाजीराव शिंदे आणि काँग्रेस समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला. सभापतीवर अविश्वास ठराव आणण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. शिंदे हे राष्ट्रवादीचे असले तरी त्यांना आता अविश्वास ठराव जिंकण्यासाठी काँग्रेसच्या कुबड्या घ्यावा लागणार होत्या. शिवाजीराव शिंदे यांना मदत करण्यासाठी काँग्रेसही एकवटली होती. राष्ट्रवादीकडे ४४ एवढे पुरेसे संख्याबळ सभागृहात नसल्यामुळे राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात हार मानण्याची नामुष्की ओढावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा अविश्वास ठराव जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला हा अविश्वास ठराव कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचा नाही यासाठी राष्ट्रवादीचे सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या पाठीमागे काँग्रेसची ताकद पणाला लावली होती. रामराजे नाईक-निंबाळकर ठराव जिंकण्यासाठी, तर काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी अविश्वास ठराव कसा नामंजूर होईल, यासाठी रणनीती आखली होती. अखेर राजकीय पटलावरील खेळात आमदार जयकुमार गोरे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी व्हीपही धुडकावला ! राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखेसह तीन सदस्य व्हीप बजावूनही अनुपस्थित राहिले, तर काँग्रेसच्या सर्व १८ सदस्यांनी सभागृहात न येता गैरहजर राहणे पसंत केले. सभागृहात ४४ संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली होती. इकडे आड...अन् तिकडे विहीर, अशी अवस्था झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. सभागृहात अविश्वास ठरावाच्या बाजूने ३६ सदस्यांनी सह्या केल्या. मात्र, सभागृहाच्या दोन तृतीयांश म्हणजे ४४ सदस्य संख्या नसल्याने राष्ट्रवादीने शिवाजीराव शिंदे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आल्याचे पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)