शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी, खोतांची मंित्रपदासाठी नौटंकी!

By admin | Updated: December 8, 2015 00:31 IST

पंजाबराव पाटील : ‘स्वाभिमानी’ला आंदोलनासाठी कार्यकर्तेच मिळणार नसल्याचा दावा

सातारा : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्या मोदी सरकारशी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी दोस्ती केली आहे. मंत्रिपद मिळण्याच्या आशेने या दोघांनीही भाजपचा हात धरला होता. आता मंत्रिपद मिळत नसल्याचे दिसल्यानंतर त्यांना ऊस उत्पादकांचा पुळका आला असून, आता ते आंदोलनाची भाषा वापरून नौटंकी करत आहेत,’ असा घणाघात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उसाला एक रकमी मिळाली पाहिजे, येत्या आठ दिवसांत शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांसमोर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पाटील म्हणाले, ‘स्वामिनाथन कमिटीच्या निर्णयाला केंद्रातील मोदी सरकारने विरोध केला होता. मंत्रिपद मिळेल, या आशेने शेट्टी यांनी त्यांचा हात धरला. आमच्या जीवावर त्यांनी आंदोलने उभी केली, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता मंत्रिपद मिळेना असे वाटू लागल्याने ते आंदोलनाची भाषा वापरू लागले आहेत. शेट्टी यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला असल्याने आता लढणारी फौज त्यांच्यासोबत राहिलेली नाही,’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.दरम्यान, सध्या रयत सहकारी साखर कारखाना शासनाचा गळीत परवाना नसताना व पाठीमागील गळीत हंगामातील गेलेल्या उसाचे बिल अद्याप दिले नसताना तसेच तोडणी व वाहतूकदारांचे बिल अद्याप दिले नसताना कारखाना सुरू झाला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यासाठी ६ कोटी ११ लाख ९0 हजार इतके सॉफ्ट लोन शासनाने मंजूर करूनही नव्याने प्रशासक आलेल्या अथणी शुगर प्रा. लि. ने हे कर्ज नाकारले आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतो. येत्या आठवडाभरात यावर निर्णय घ्यावा. तसेच ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी दर न देणाऱ्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी इस्लापूरचे डी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, दीपक पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तर अधिकाऱ्यांचे अपहरणऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रक्तरंजित क्रांती केली जाईल. एसी मध्ये बसून शेतीचे धोरण ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना डोंगरात नेऊन ठेवू, असा इशारा डी. जी. पाटील यांनी यावेळी दिला.