शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी पुरविला आठ वर्षीय सुमेधचा बालहट्ट!

By admin | Updated: May 10, 2016 02:27 IST

जणू आजोबांना भेटल्याचा आनंद : पत्र पाठवून केली होती भेटण्याची इच्छा व्यक्त; काटकर कुटुंबीय गेले भारावून

संजय कदम-- वाठार स्टेशन  -‘स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याशी माझा मावसभाऊ गप्पा मारायचा. त्यांना आजोबा म्हणायचा, मग माझे आजोबा कोण?,’ असा प्रश्न एका मुलानं विचारल्यानंतर आईनं ‘तुझे आजोबा शरद पवार आहेत,’ असं सांगितलं. अन् मग काय.. या मुलानं थेट शरद पवार यांनाच पत्र पाठवून भेटण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे, या मुलाचा बालहट्ट देशाच्या राजकारणातील मोठया व्यक्तिमत्त्वानंही पूर्ण केला. सोमवारी एका कार्यक्रमासाठी पवार साताऱ्यात आले असता, त्यांनी त्या मुलाची भेट घेतली.आठ वर्षीय सुमेध काटकर असं त्या मुलाचं नाव. त्याची आई अ‍ॅड. सुचित्रा काटकर या लेखिका आहेत, तर वडील प्रवीण काटकर यांचा साताऱ्यातच मेडिकल व्यवसाय आहे. साताऱ्यातील आदर्श प्राथमिक शाळेत तो तिसरीत शिकत आहे. सुचित्रा यांची बहीण माढा तालुक्यातील एका प्रतिष्ठीत राजकारण्याची सून असल्याने माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची या कुटुंबाशी जवळीकता होती. विलासराव माढ्यात आल्यानंतर ते या घरी भेट देत असत. यावेळी सुमेधचा मावसभाऊ हा विलासराव देशमुख यांच्याबरोबर खेळत असायचा आणि त्यांच्या भेटीचे किस्से सुमेधला सांगायचा. त्यामुळं तो आईला नेहमी ‘माझे आजोबा कोण?’ हा प्रश्न विचारायचा. आई अ‍ॅड. सुचित्रा घोगरे-काटकर त्याला ‘तुझे आजोबा शरद पवार आहेत,’ असे सांगून आपल्या एका पत्रकार मित्रास फोन लावून बाबांशी म्हणजेच शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगत होत्या. मात्र शरद पवारांनाच प्रत्यक्षात भेटण्याचा हट्ट ज्यावेळी सुमेधने धरला, त्यावेळी ‘तू स्वत:च्या हाताने शरद पवारांना पत्र लिही,’ असा सल्ला आईने दिला. तेव्हा सुमेधने ११ एप्रिल रोजी थेट पवारांनाच पत्र पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मग दि. २८ एप्रिल रोजी पवारांना साताऱ्यात भेटण्याचं निमंत्रण त्याला दिल्लीतून मिळालं. ठरल्याप्रमाणे ‘दि. ९ रोजी दुपारी साडेचार वाजता शासकीय विश्रामग्रह सातारा येथे भेटण्यास यावे,’ असे सांगितले गेले. त्यानुसार सुमेध, आई सुचित्रा, वडील व मामा उमेश अनपट यांनी विश्रामग्रहात शरद पवारांची भेट घेतली. यावेळी सुमेधच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत ‘अभ्यास कर, मोठा हो,’ असा पवारांनी सुमेधला आशीर्वाद दिला व त्यांचे स्वत:चे आत्मचरित्र असलेले पुस्तक त्याला भेट दिले. या अनोख्या भेटीमुळं चिमुकल्या सुमेधचा आनंद द्विगुणित झालाच अन् काटकर कुटुंबही भारावून गेले.बारामती सुंदर, मग सातारा का नाही?बऱ्याच वेळा सुमेध आजोळी जाताना त्याला बारामतीची सुंदरता नेहमीच आवडायची. मग बारामती चांगली आहे तर सातारा का नाही, असा प्रश्न सुमेध विचारायचा. यावर बारामतीचा विकास शरद पवारांनी केला, आपण साताऱ्यात शरद पवारांना घर बांधायला सांगू, असं उत्तर आई सुचित्रा मुलाला देत असे.नेहमी फोनवर बोलणाऱ्या आजोबांशी प्रत्यक्ष भेटल्यामुळे खूपच आनंद झाला. त्यांना मी पत्र पाठविले होते. सोमवारी त्यांनी आम्हाला भेटायला बोलावलं. त्यांनी मला शाबासकी पण दिली. आता मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्याशी पत्रव्यवहार करुन फटाक्यांवर बंदी घालण्याची अशी मागणी करणार आहे. - सुमेध काटकरसुमेध सतत प्रश्न विचारताना अनेक वेळा शरद पवार यांना भेटाण्यासाठी माझ्याजवळ हट्ट धरला. सुमेधने पाठविलेल्या पत्राची दखल त्यांनी घेतली व आमची त्यांच्याशी भेट झाली, याचा आम्हाला आनंद आहे. - सुचित्रा काटकर, सुमेधची आईसाताऱ्यात सोमवारी शरद पवार व सुमेधची भेट झाली.