शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

शहाबागला माणुसकी आली धावून!

By admin | Updated: January 28, 2017 22:41 IST

परिसर हादरला : आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे

संजीव वरे --पसरणी  शनिवारी सकाळी साडेनऊ, दहाची वेळ... वाईच्या शहाबाग परिसरातील नागरिकांचा दिनक्रम हळूहळू सुरू होत होता. याचवेळी एका मोठ्या आवाजाने हा परिसर हादरून गेला आणि काही क्षणातच हळद शिजविण्याच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तो स्फोट एवढा मोठा होता की, बॉयलरचे काही अवशेष जवळ जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन पडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने वाईच्या शासकीय दवाखान्यात नेण्यासाठी मोठी मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले. कृष्णा नदीच्या काठी शहाबाग, फुलेनगर या सधन आणि शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या परिसरात व तालुक्यातील काही गावांत शेतकरी उसाबरोबरच हळदीच्या पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतात. वाईची ‘आंबे हळद’ प्रसिद्ध आहे. पर्यटकापासून सर्वांची मोठी मागणी असते. पूर्वीच्या काळी शेतकरी हळदीचे पीक काढल्यानंतर ती शिजविण्यासाठी मोठमोठ्या लोखंडी कढईचा वापर करत. यासाठी दोन-तीन महिन्यांचा हा हंगाम चालायचा. परंतु शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने उत्पादनात व प्रक्रियेमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या हळद शिजवण्यासाठी बॉयलरचा वापर होऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ व श्रम वाचू लागले व संपूर्ण हंगाम एक ते दीड महिन्यात उरकू लागला; पण हा बॉयलर स्वयंपाकाला वापरण्यात येणाऱ्या गॅसप्रमाणे तसेच भात, डाळ शिजवण्याच्या कूकरप्रमाणे त्याची काळजी घेणे गरजेचे असते. ती न घेतल्यास दरवर्षी लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. परंतु शनिवारचा सकाळचा स्फोट एवढा मोठा होता की, यात लहान मुलासह तीनजण जखमी झाले आहेत. नागरिकांची धाव..घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन, रुग्णवाहिकांना फोन केला. उपचारासाठी माणुसकीचे दर्शन दाखवून मोठे सहकार्य केले. यामध्ये प्रदीप जमदाडे, नगरसेवक सतीश वैराट, संग्राम पवार, अमजद इनामदार, सतीश घोडके, शिवा इडलगे आदींनी सहकार्य केले.