शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

सेवागिरी यात्रा जबाबदारीने पार पाडा

By admin | Updated: December 12, 2014 23:40 IST

आढावा बैठक : अश्विन मुदगल यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

पुसेगाव : पुसेगाव यात्रेशी संबंधित शासनाच्या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यात्रेकरूंना अधिकाधिक सेवा सुविधा पुरवाव्यात. सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी पाण्याचे प्रदूषण टाळून शुध्द पाणीपुरवठा करावा. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केल्यास गुन्हेगारीला पायबंद बसण्यास मदत होईल, अशा सूचना देत यात्रा जबाबदारीने पार पाडावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त १६ ते २६ डिसेंबर या कालावधीत यात्रा भरविण्यात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी येथील नारायणगिरी सभागृहात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी प्रांत मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पखाले, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, सरपंच मंगल जाधव, उपसरपंच संदीप जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)वाहतुकीत बदल : यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, वहातुकीची कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याहून दहिवडीकडे जाणाऱ्या गाड्या नेर मार्गे तर दहिवडी व वडूजकडून सातारकडे जाणाऱ्या गाड्या विसापूर, खातगुण, जाखणगाव व चौकीचा आंबा मार्गे जाण्याचे नियोजन केले आहे. या शिवाय दि. २० व २१ रोजी पुसेगावमध्ये कोणतेही वाहन आत येऊ दिले जाणार नाही. ‘नो पार्किंग’ झोन ही तयार करण्यात आला आहे.यात्रेत यंदा :-गतवर्षी पेक्षा २५टक्के अधिक पोलीस बंदोबस्तवाहतूक व्यवस्थेत बदलमंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फलकांना बंदीरथमार्गातील सर्व अडथळे दूर होणारपरिवहनकडून भाविकांसाठी १४५ ज्यादा गाड्याअखंड वीजपुरवठारथयात्रेदिवशी अ‍ॅमगार्डची स्वतंत्र व्यवस्थाशुद्ध पाणीपुरवठाआरोग्य कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पथकेज्यादा रुग्णवाहिका