शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फलटण अन् कोरेगावच्या नेत्यांना गडचिरोलीला पाठवू

By admin | Updated: June 13, 2016 00:19 IST

जयकुमार गोरे : रामराजेंवर टीकास्त्र; शशिकांत शिंदेंना कुणी विचारत नसल्याचा टोला

खटाव : ‘प्राध्यापक फलटणकरांना सैराट या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? सैराट म्हणजे बेभान आणि मी जनतेच्या कामांसाठी सुरुवातीपासूनच बेभान आहे. मात्र, बारामतीला मुजरा घालणाऱ्या, स्वत:चा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना जनतेचे देणे-घेणे नाही. कोरेगावकरांना तर आता कुणी विचारत नाही. त्यामुळे त्यांचे तोंड चालायला लागले आहे. माण-खटावच्या नादाला लागल्यावर थेट गडचिरोलीला जावे लागते,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांना नाव घेता लगावला. निमसोड, ता. खटाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अजित देशमुख, माजी सभापती अशोक गोडसे, ज्येष्ठ नेते धोंडिबापू मोरे, प्रदीप जाधव, काकासाहेब मोरे, डॉ. महेश गुरव, सोमनाथ भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, अ‍ॅड. सूरज पाटील, तुकाराम देवकर, शंकर माळी, सोमनाथ बुधे, मोहन देशमुख, सचिन फडतरे, चंद्रकांत देशमुख, सुखदेव फडतरे, नीलेश करपे, विजय मोरे, राजेश निकम, तानाजी देशमुख आदी उपस्थित होते. रामराजे आणि शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना आमदार गोरे म्हणाले, ‘फलटणकर राजे पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावमध्ये पाणी येणार नाही, असे सांगायचे. त्यांनी कधी त्यासाठी प्रयत्न केलेच नाहीत. त्या माणसांनी नेहमी खोडा घालायचे काम केले. त्यांनी प्रयत्न केले असते तर २० वर्षांपूर्वीच आपल्याकडे पाणी आले असते. आपल्या भागाचा कायापालट झाला असता. या भागाला पाण्यापासून वंचित ठेवणारे फलटकर मला बघून घेण्याची भाषा करीत आहेत. माझ्याकडे खरे तर त्यांनी एकदा बघावेच. कोरेगावकरांना कोणी विचारत नाही म्हणून परवा त्यांनी तोंड उघडले. मी आमदार झाल्यापासून माण-खटावकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. बारामती, फलटणला मुजरे घालणाऱ्यांनी जरा जपून बोलावे असे सांगून आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘निमसोडच्या विकासात कधीच कमी पडलो नाही. इथले दोन्ही नेते निक्रिय आहेत. त्यांना ज्या जनतेने मोठे केले. त्या जनतेचाच त्यांनी विश्वासघात केला. काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या गाडीत बसून त्यांची पायताणे उचलून गावाचा विकास होत नाही.’ असा टोलाही त्यांनी लगावला. (वार्ताहर)विरोधकांची बिनचाकाची गाडी...या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला. विरोधकांची बिनचाकाची गाडी...या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला.