शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात शंभर उपग्रह सोडण्याच्या उपक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील आठ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

सातारा : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजीच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले १०० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करणार ...

सातारा : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजीच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले १०० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करणार आहे. हे उपग्रह बनविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारीला रामेश्वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ चे आयोजन केले गेले आहे.

भारतात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांची टीम स्वत: उपग्रह बनवेल. हे उपग्रह बनविण्याचे ६ ऑनलाइन प्रशिक्षण झाले आहेत. २ ते ७ जानेवारी दरम्यान ऑनलाइन प्रशिक्षण झाले. प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याच्या प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे १८ ते २२ जानेवारी दरम्यान बॅचप्रमाणे एक दिवसीय प्रशिक्षण चेन्नई येथे दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून त्यांचा उपग्रह प्रत्यक्ष बनवून टेस्ट करून घेतला जाईल. ७ फेब्रुवारी रोजी डीआरडीओचे चेअरमन यांच्या उपस्थितीत रामेश्वरम येथून हेलियम बलूनमार्फत पृथ्वीच्या समांतर कक्षेत हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील.

जागतिक पातळीवर नोंद होणाऱ्या या प्रकल्पात विद्यार्थ्यांना सहभागी होता आले आहे. उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याच्या संधीबरोबरच स्वत: प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी, पूरक अवजारांचे मोफत किट, उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याची संधी यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे.

चौकट :

सातारा शहरातून अनंत इंग्लिश स्कूलच्या वैष्णवी गायकवाड, एलबीएसचा ललीत वाडेकर, शिरवळच्या ज्ञानसंवर्धिनी विद्यालयातील अथर्व नेवसे, कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे येथील दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राजवर्धन पाटील यांचा समावेश आहे. कोल्हापूर येथील श्री हणमंत चाटे हायस्कूलचा पार्थ पाटील, डॉ. सायरस पुनावाला स्कूल पेठवडगाव महमंद जहीद मुनीर मोमीन, अथर्व कदम, रत्नागिरीचा सियाग परुळेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

चौकट :

महत्त्वाकांक्षी अवकाश शेतीसाठी उपयुक्त

जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम) १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केससोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायॉक्सिड हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोडसोबत काही झाडांचे बीजसुद्धा पाठवण्यात येत आहे. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल, अशी माहिती फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांनी दिली आहे.

कोट :

निमशहरी आणि ग्रामीण भागातील टॅलेंट बाहेर काढण्याबरोबरच स्पेस टेक्नॉलॉजीत विद्यार्थ्यांची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे. याद्वारे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात असलेली संधी हेरून विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

- गजानन वाडेकर,

शिक्षण समुपदेशक, सातारा

आयकार्ड फोटो

१४ललीत वाडेकर

१४राजवर्धन पाटील

१४वैष्णवी गायकवाड

१४अथर्व नेवसे