शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वी बियाणे उगवणक्षमता तपासणे गरजेचे : काशिद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

पिंपोडे बुद्रुक : ‘शेतात पेरणी करतेवेळी वापरले जाणाऱ्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे. त्याआधारेच पेरणीसाठी बियाणे किती प्रमाणात ...

पिंपोडे बुद्रुक : ‘शेतात पेरणी करतेवेळी वापरले जाणाऱ्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे. त्याआधारेच पेरणीसाठी बियाणे किती प्रमाणात वापरणे याचा अंदाज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक तानाजी काशिद यांनी केले.

बहुतांशी शेतकरी शेतात पेरणीसाठी घरगुती बियाण्यांचा वापर करतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी घरीच बियाण्याची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरणीसाठी वापरले जाणारे बियाणे पेरणी योग्य आहे किंवा त्याची उगवणक्षमता किती आहे यांचा अंदाज करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची घरीच तपासणी करावी तसेच त्यावर बीजप्रक्रिया केल्यास अधिक उपयुक्त ठरते, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक तानाजी काशिद यांनी दिला आहे.

अशी करा तपासणी

बियाण्यातील शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटिमीटर अंतरावर दहा ते दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करा. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करा व बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारा. थंड ठिकाणी ठेवून त्यावर अधूनमधून पुन्हा शिंपडून ओले करावे. सहा-सात दिवसांनी चांगले‌ कोंब आलेले दाणे वेगळे करावे. शंभरपैकी सत्तरपेक्षा जास्त दाणे चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे उगवणीच्या गुणवत्तेचे आहे असे समजावे. मात्र ६० टक्केपेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास त्या बियाण्यांची पेरणी करू नये.