शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘डिअर सीम युझर, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असून प्लीज, आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘डिअर सीम युझर, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असून प्लीज, आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, नाहीतर तुमचे सीमकार्ड चोवीस तासांत ब्लॉक होईल,’ असा मेसेज जर तुम्हाला येत असेल तर सावधान. कारण हा मेसेज फसवा असून, या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट मोकळे करण्याचा उद्योग काही ऑनलाईन ठकसेनांनी सुरू केला आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अजूनही जोमात सुरू आहेत. पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना देऊनही अनेक नागरिक अशा फसव्या भूलथापांना बळी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना सीम व्हेरिफिकेशनचे मेसेज येत आहेत. नागरिकही सीमकार्ड बंद पडेल या भीतीने कोणतीही खातरजमा न करता ठकसेनांच्या सूचनांचे पालन करत आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्ले-स्टोअर वरून टीम व्ह्युअर, एनीडेस्क व अन्य अ‍ॅप डाऊनलोड करीत आहेत आणि इथेच घोळ होत आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हे ठकसेन ग्राहकांचा मोबाईल डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून थेट त्यांचे बँक खाते रिकामे करत आहेत. इतर जिल्ह्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातही अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक फसव्या मेसेजेसला बळी पडत आहेत. आपल्याला आलेला कोणताही मेसेज कंपनीकडून आलेला आहे किंवा नाही याची खातरजमा केली तरच नागरिकांची आर्थिक फसवणूक टळू शकते.

(चौकट)

अ‍ॅप डाऊनलोड करू नका

सीम ब्लॉक होऊ नये म्हणून ठकसेन ग्राहकांना वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. अ‍ॅप डाऊनलोड करताच ग्राहकाच्या मोबाईलमधील डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून बँक खात्यातून रक्कम वळती करून घेतली जाते. खात्यातून रक्कम कमी झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

(चौकट)

असा कॉल व मेसेज आल्यास काळजी घ्या

१. दूरध्वनी कंपनीकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे फसवे मेसेज पाठविले जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी व्हेरिफिकेशन तसेच इतर कोणत्याही प्रकारचे मेसेज आल्यास तातडीने संबंधित कंपनीशी संपर्क साधावा.

२. फोनवरून अथवा मेसेजवरुन जर कोणी कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा असे सांगत असेल तर त्यावर चुकूनही विश्वास ठेवू नका.

३. ऑनलाइनद्वारे आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे अशा फसव्या मेसेज व कॉलपासून फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.

(चौकट)

अशी काळजी घ्या

आपले सीम ब्लॉक होणार आहे किंवा नाही याची प्रथम कंपनीकडे शहानिशा करा. कोणत्याही अनोळखी फोन व मेसेजवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नका. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.

(पॉइंटर)

मोबाईलवरून फसवल्याच्या तक्रारी

२०१९ : १३

२०२० : ७

२०२१ : ३