शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शालेय परिपाठाबरोबरच मिळतात संगीत शिक्षणाचेही धडे

By admin | Updated: June 28, 2016 22:33 IST

वाग्देव विद्यालय : २५ तबला तर २५ हार्मोनियम वादकांना दिले जाते प्रशिक्षण - अशी ही शाळा जगावेगळी

संजय कदम -वाठार स्टेशन  कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील आदर्श शिक्षण संकुल म्हणून परिचित असलेल्या वाठार स्टेशन येथील वाग्देव विद्यालयात बुद्धिवंत संस्कारमय विद्यार्थी घडवण्याबरोबरच या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी ५० मुला-मुलींना तबला, हार्मोनियमचे प्रशिक्षण दिले जाते. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे एक संगीत परंपरा जपणारी व जोपासणारी शाळा म्हणूनच या शाळेची वेगळी ओळख सातारा जिल्ह्यात आहे.वाठार नगरीचे आराध्य दैवत समर्थ वाग्देव महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या वाग्देव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत दोन हजारांहून अधिक मुले-मुली सर्वप्रकारचे शिक्षण घेत आहेत. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार घडवणाऱ्या या शाळेत सकाळच्या कामाची सुरुवातच संगीतमय परिपाठाने होते. यावेळी एकूण ५० मुले-मुली तबला-हार्मोनियम वादन करून प्रार्थना,भक्तिगीताचे गायन करतात. संगीताचे विशेष शिक्षण देताना या मुलांना शासनमान्य गंधर्व विद्यालयाच्या संगीताच्या परीक्षा घेतल्या जातात यासाठी वाग्देव भक्तिमंच निर्माण करण्यात आला असून, शाळेच्या या उपक्रमाची परिसरातील गावांना ओळख व्हावी यासाठी हा कलामंच परिसरातील गावात समाजप्रबोधन,भारुड, मुखनाट्य, अभंग व भक्तिगीतांचे सादरीकरण करत आहे. या उपक्रमास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्ता प्रदान शिक्षण देताना या शाळेच्या विद्यार्थ्यांना बाह्यज्ञान आत्मसात करता यावे यासाठी विशेष प्रयत्न या शाळेमार्फत करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून या शाळेने अत्तापर्यंत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या शाळेत प्रतिवर्षीच्या यशस्वी गुणवंतांचा गुणगौरव वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या शाळेमार्फत केला जातो.या शिवाय आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो, बागडलो व ज्यांनी आपल्याला घडवले अशा शिक्षकांचा सन्मान या शाळेतील शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी संघा मार्फत वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जातो. अशा संस्कार परंपरा जपणाऱ्या या शाळेस या गावकऱ्यांचेही मोठे पाठबळ मिळत आहे.संगीत विशारद व राज्यात देशात तबला वादनाचे शेकडो पुरस्कार मिळविलेले सुनील राजे यांनी या शाळेत अनेकांना तबला विशारद बनवले. आज ते जरी या शाळेत नसले तरी या शाळेत कार्यरत असलेले संगीत शिक्षक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगवादक मदन कदम, प्रा. डी. के. भिसे व दिलीपकुमार धुमाळ यांच्या माध्यमातून कला-क्रीडा संस्कृतीचा हा वारसा ही शाळा जोपासत आहे. राज्य शासनाने कल चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. परंतु यापुर्वीच या विद्यालयाने असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शालेय ज्ञान ही एकमेव गोष्ट आवश्यक नाही तर आजच्या स्पर्धेच्या युगात लागणारे संगणकीय ज्ञान त्याला अवगत झाले पाहिजे यासाठी या शाळेने संगणक शिक्षणावर भर दिला आहे. याशिवाय विद्यार्थी संस्कारमय व्हावा त्याच्यातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी या शाळेत प्रतिवर्षी ५० मुला-मुलींना संगीताचे शिक्षण मोफत दिले जात आहे.- ज्योती पंडित, प्राचार्या, वाग्देव हायस्कूल, वाठार स्टेशन