शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पसरणी घाटाला दरडींचे दुखणे!

By admin | Updated: September 9, 2014 23:44 IST

सत्र सुरूच : चालू वर्षातील चौथी घटना

वाई : सतत पडणाऱ्या पावसामुळे वाई-पसरणी घाटात सोळा नंबर ते हॅरीसन फॉल्डी (थापा) या भागात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानीचा प्रकार घडला नाही. मात्र प्रवाशी व शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. घटनास्थळी वाईचे तहसीलदार एस. एम. पडदुणे यांनी पाहणी केली. बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग हजर राहून दरड हटविण्याचे काम करण्यात आले.देशभरातील हजारो पर्यटक व वाईहून पसरणी-महाबळेश्वरला कामानिमित्त जाणारे नागरिक, शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी वाई-पाचगणी घाटातून प्रवास करत असतात. अत्यंत नागमोडी वळणाचा व पावसाळ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्य असलेल्या या परिसरात अनेक उंच कडे दरडी आहेत.या वर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार घडले आहेत. वाई-पसरणी घाटात ही चौथी घटना असून यावर्षी अशा घटनेमुळे पर्यटक, स्थानिक प्रवाशी व विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली असून त्यामुळे घाटात प्रवाशांच्या गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बांधकाम विभागाच्या दोन जेसीबी, दगड फोडण्याचे ब्रेकर यांनी दरड हटविण्याचे काम केले. (प्रतिनिधी)अलिकडच्या काळात डोंगर दऱ्यावरील मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व दरवर्षी लावले जाणारे वणवे यामुळे डोंगरमाथे बोडके झाले आहेत. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच रस्ता रुंदीकरणाच्या वेळी करत असलेले मोठे ब्लास्ट यांनाही कडे-दरडी यांना मोठे हादरे बसून मोठ्या भेगा पडतात. पावसाळ्यात यात पाणी जाऊनही दरडी कोसल्याने वाई-पसरणी घाटात अलिकडच्या काळात वाढले आहेत. मी विद्युत कंपनीच्या पाचगणी येथील कार्यालयात काम करते. वाईहून कामाला जात असून वारंवार घडणाऱ्या दरड कोसळणाऱ्या घटनांमुळे कामावर वेळेवर पोहोचता येत नाही.संगीता निकमविद्युत कंपनी, कर्मचारी घटना घडल्यानंतर ताबडतोब बांधकाम विभागाच्या दोन जेसीबी, एक ब्रोकर व ट्रॅक्टर ट्रॉली लावून दरड हटविण्याचे काम हाती घेतले व प्रवाशांसाठी लवकरच रस्ता मोकळा करण्यात आला.एस. एम. पडदुणे, तहसीलदार, वाई