शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनर किलिंग’चा साताऱ्यात निषेध

By admin | Updated: December 19, 2015 01:08 IST

सहआरोपींचा शोध घ्या : महिला लोक आयोग संघटनेची मागणी

सातारा : कोल्हापूर येथे घडलेल्या ‘आॅनर किलिंग’च्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘राज्य महिला लोक आयोग’ या संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भावांनी आणि त्याच्या मित्राने हा खून केला, त्यांना पाच तासांत पोलिसांनी अटक केली ही चांगली गोष्ट आहे. परंतु, या दोघांना सख्ख्या बहिणीचा खून करायला लावणारे आणि जातीसाठी भयंकर कृत्य करायला उद्युक्त केले. त्या सर्वांचा पोलिसांनी शोध घेऊन भारतीय दंड संहितेनुसार कट करून खून केल्याप्रकरणी सहआरोपी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. राज्य शासनाने ‘आॅनर किलिंग’संदर्भातील विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे. तरुण मुला-मुलींना बदललेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जाती-धर्मापलीकडे जाऊन आपला जोडीदार निवडण्याचा, त्याच्याशी लग्न करून सुखी होण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. तरीही पुरुषसत्ताक व्यवस्थेची तरुण पिढी बळी जात आहे. हे आपण शांतपणे बघू शकत नाही. काही स्त्रियांदेखील संघर्ष नको म्हणून कुटुंबाअंतर्गत शांत राहून त्या जीवघेणी तडजोड करतात. त्याही या जात व्यवस्थेचा बळी जात आहेत. निवेदनावर अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, राज्य सचिव अ‍ॅड. शैला जाधव, जिल्हाध्यक्षा माया पवार, बसंती दायमा, वनिता शेळके, कविता बनसोडे, प्रेरणा भिलारे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)