शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी साताऱ्याचा मार्ग खुला!

By admin | Updated: June 28, 2016 23:15 IST

जिल्हावासीयांना अपेक्षा : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण

सातारा : राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार, या चर्चेला उधाण आले आहे. आता तरी साताऱ्यात मंत्रिपदाच्या रूपाने लालदिवा मिळणार का?, अशी चर्चाही जिल्ह्यात रंगू लागली आहे. किमान एक हक्काचा लालदिवा साताऱ्याला मिळाला तर पालकमंत्र्यांची भासणारी कमतरता यानिमित्ताने भरून निघेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.राज्यातील आघाडीची सत्ता गेल्यानंतर जिल्ह्याचे हक्काचे मंत्रिपदही हिरावून घेतले गेले. महायुतीच्या सत्तेच्या काळात साताऱ्यात आपले प्राबल्य वाढविण्यासाठी भाजप मंत्रिपदाच्या निमित्ताने प्रयत्न करेल, असे वाटत होते; परंतु याबाबत भाजपने अद्याप पाऊल टाकलेले नाही. भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळालेली आहे. आता या आमदारकीचे रूपांतर मंत्रिपदात केले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिपदासाठी कुणाच्या दारात भीक मागायला जाणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य आ. महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. आता भाजपच त्यांची वर्णी मंत्रिपदावर करून त्यांची नाराजी दूर करेल काय, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात नव्याने कोणाचा समावेश होणार?, याबाबतची चर्चा सुरू आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना बढती देऊन महसूलमंत्री केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हेच साताऱ्यात जास्त काळ असतात. पालकमंत्र्यांना साताऱ्यात यायला वेळ मिळत नसल्याने जिल्ह्याला स्वतंत्र मंत्रिपद देऊन भाजप शिवसेनेवर यानिमित्ताने खेळी करू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी पालकमंत्री विशेष काही हालचाल करत नसतील रासपला बळ देण्यासाठी भाजपही उत्सुक आहे. राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन प्रबळ पक्षांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठीही भाजप ही चाल खेळू शकतो. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे जानकर लवकरच मंत्रिमंडळात दिसतील, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार जानकर यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी त्यांचेही प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)नियोजन भवनानंतर थेट मंत्रिमंडळात!विधान परिषदेतर्फे आमदारकी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांना जिल्ह्याच्या नियोजन भवनात प्रवेश मिळाला. आता मंत्रिपदाच्या माध्यमातून ते थेट मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता आहे.