शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमधील दोन केंद्रात शनिवारी कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

फलटण : कोरोना लसीकरणासाठी फलटण तालुका सज्ज झाला असून, शनिवार, दिनांक १६ जानेवारी रोजी फलटण तालुक्यामध्ये दोन ठिकाणी पहिल्या ...

फलटण : कोरोना लसीकरणासाठी फलटण तालुका सज्ज झाला असून, शनिवार, दिनांक १६ जानेवारी रोजी फलटण तालुक्यामध्ये दोन ठिकाणी पहिल्या टप्प्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. जगदाळे यांनी दिली आहे.

फलटण शहरात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकर मार्केट (जुनी मंडई) फलटण व प्राथमिक आरोग्य केंद्र, तरडगाव (ता. फलटण) येथे पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण सत्रामध्ये सर्व शासकीय आरोग्य स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक कर्मचारी, आशा व त्यांच्या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांची कोव्हीन अ‍ॅपमध्ये नोंदणी केली आहे. कोरोना लसीकरण दोन डोसमध्ये देण्यात येणार आहे. लसीकरणाचे दोन डोसमधील अंतर चार आठवड्यांचे असेल. दहा दिवसांमध्ये सर्व शासकीय आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी यांचे लसीकरण करून पहिला डोस पूर्ण करण्यात येणार आहे.

यानंतर पोलीस कर्मचारी व फ्रंट लाईन कर्मचारी यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी कोव्हीन अ‍ॅपमध्ये वैयक्तिक माहिती भरणे गरजेचे आहे. तसेच फोटो ओळखपत्रासह जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाच्या एक दिवस अगोदर संबंधितांना लसीकरणाची तारीख, ठिकाण, वेळ याचा संदेश रजिस्टर केलेल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.