शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शततारांच्या झंकाराने सातारकरांना बांधले !

By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST

अविस्मरणीय मैफल : पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरमधून बरसल्या स्वरधारा

सातारा : पहाडी संगीताची आठवण करून देणाऱ्या संतूरच्या शततारा आणि त्यातून पंडित शिवकुमार शर्मा यांनी नादब्रह्माला घातलेली साद. सोबतीला पंडित योगेश सम्सी यांच्या तबल्याची जादू... सातारकर रसिकांना आणखी काय हवे होते? दोन तासांहून अधिक काळ श्रोते डोलत राहिले आणि संतूरमधून स्वरांचे पाणलोट वाहत राहिले.सातारच्या ‘पंचम’ ग्रुपने पुण्याच्या व्हायोलिन अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने ही मैफल सातारच्या शाहू कलामंदिरात आयोजित केली होती. सुमारे तीस वर्षांनंतर साताऱ्यात आलेल्या पं. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या ७८ व्या वर्षीही संगीताची तीच मोहिनी सातारकर रसिकांवर घातली. ‘यमन’ रागातील आलापांनी पंडितजींनी मैफलीस प्रारंभ केला. स्वरांची आस, बारकावे दाखविण्याचे कसब हेच पंडितजींचे श्रेष्ठत्व असल्याचा पुन:प्रत्यय रसिकांना आला. संथ आलापीने सुरुवात करून रागविस्ताराची पायाभरणी त्यांनी केली. जोड वाजविताना लयीचे विविध प्रकार सादर केले. द्रुत लयीत झपताल आणि त्रितालातील रचना त्यांनी सादर केल्या. तबलावादक पं. सम्सी आणि पंडितजींची जुगलबंदी अद्वितीय होती. उत्तरार्धात खेमटा तालातील मिश्र धुन सादर करून पंडितजींनी प्रेक्षागृहाला डोलायला लावले. या धुनमधील वैविध्य, गतिमानता आणि आकृतिबंध खिळवून ठेवणारे होते. (प्रतिनिधी)२२२