शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

साहित्यनगरी सजणार सातारी झेंड्याने : कुलकर्णी दाम्पत्याने बनविले उपरणे, बॅचेस, आबदागिरी

नितीन काळेल -सातारा -एप्रिल महिन्याच्या प्रारंभी पंजाब राज्यातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीतील साहित्य संमेलनात सातारकरांचाही मोठा सहभाग राहणार आहे. कारण, संपूर्ण साहित्य संमेलन सजणार आहे, ते सातारी झेंडे, उपरणे, आबदागिरी, बॅचेसनी. हे सर्व साहित्य साताऱ्यातील मंदार आणि नूतन कुलकर्णी या दाम्पत्याने बनविले आहे. नुकतेच झेंडे, टोप्या, बॅचेस, उपरणे हे घुमान येथे पोहोचही झाले आहेत.संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानकडे पाहिले जाते. अनेक वर्षे संत नामेदव महाराजांनी पंजाबमध्ये भागवत धर्माची पताका फडकविली. त्यांच्या कर्मभूमीतच म्हणजे घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळ व संपूर्ण घुमाननगरी सजणार आहे, ते सातारी झेंडे, पताक्यांनी.सातारा शहरातील मंदार आणि नूतन कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनात लागणारे झेंडे, पताका, आबदागिरी, टोप्या, बॅचेस बनविले आहेत. यामध्ये प्रथमच पंचकोनी, तोरण झेंड्यांचाही समावेश झालेला आहे. साहित्यिकांच्या स्वागतासाठी विविध रंगी पट्टे तयार करण्यात आले आहेत. अशा विविध वस्त्रांनी घुमान नगरी सजणार आहे. ग्रंथपालखीच्या वेळीही साहित्यिकांच्या हातात देण्यासाठी छोटे झेंडे बनविण्यात आले आहेत. साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम आणि समारोपासाठीही महावस्त्रे बनविण्यात आली आहेत. संमेलनातील परिसंवादात सहभागी होणाऱ्या मान्यवरांसाठी आठवण राहावी म्हणून आकर्षक असे वस्त्रही तयार करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे सातारकरांचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फडकणार आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानदीप लावू जगी--साताऱ्यात तयार करण्यात आलेल्या या वस्त्रांवर साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रिंट केले आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराज यांचे चित्र आहे. त्याखाली नामदेव महाराजांचा ‘नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ ही अभंगातील ओळ आहे. तसेच पुस्तक, दौत, आणि मोरपीस यांची चिन्हेही समाविष्ट केलेली आहेत. साहित्य संमेलन म्हणजे भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा महोत्सव आहे. आमच्या घराण्यात संत आणि वारकरी पंरपरा आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनासाठी लागणारे झेंडे, उपरणे, आबदागिरी बनविण्याचे काम आम्हाला मिळाले असावे. सातारच्या झेंडे, पताकांनी घुमाननगरी सजणार असल्याने तो सर्व सातारकरांचा सन्मान असणार आहे.- नूतन कुलकर्णी