शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सातारच्या प्राध्यापकाचा पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

शिराळ्यात धिंगाणा

शिराळा : मोटारीने धडक दिल्याचा जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मागे लागलेल्या प्राध्यापकाने बुधवारी शिराळ्यात धिंगाणा घातला. त्याला पकडण्यास गेलेल्या दोन पोलिसांवर कोयत्याने वार करून पोलीस ठाण्याच्या काचाही त्याने फोडल्या. डॉ. विजय अर्जुन पवार (वय ३८, सातारा, सध्या रा. शिराळा) असे त्याचे नाव आहे. या हल्ल्यात अनुज विश्वासराव पाटील (३२) आणि अनिल श्रीरंग पाटील (३०) हे पोलीस जखमी झाले. याबाबत दुचाकीस्वार विश्वास निवृत्ती महिंद (३८, रा. शिराळा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजय पवार सातारा येथील आर्टस् अ‍ॅँड कॉमर्स महाविद्यालयात अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, तर त्याची पत्नी शिराळा येथे नोकरीस आहे. त्याचे मूळ गाव कोल्हापूर असून, तो येथील पाटील कॉलनीत राहतो. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान तो मोटारीने (क्र. एमएच ०९ बीएक्स १८१६) घराकडे निघाला होता. न्यायालयासमोर त्याने तीन दुचाकींना धडक दिली. त्यापैकी विश्वास महिंद हे दुचाकीस्वार धडक दिल्याचा जाब विचारण्यास पवारकडे गेले. त्यावेळी पवारने मोटारीतील कोयता काढला. कोयता घेऊन मारण्यासाठी तो त्यांच्यामागे धावला. त्यावेळी महिंद यांनी समोर असलेल्या पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पवारच्या हातातील कोयता धरून त्याला पकडण्यासाठी पोलीस शिपाई अनुज पाटील आणि अनिल पाटील सरसावले. यावेळी पवारने प्रवेशव्दाराच्या दरवाज्याच्या काचा आणि आरसा फोडला. या झटापटीत अनुज पाटील यांच्या कोपरावर कोयत्याचा वार बसला, तर अनिल पाटील यांच्यावरही वार झाला. यात दोघे जखमी झाले. त्यानंतर विजय पवार याला पकडण्यात यश आले. विजय पवार याच्याविरुध्द शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर) वैफल्यातून मनोरुग्ण विजय पवार याच्या आईने सांगितले की, शिराळ्यातील जमीन खरेदीत फसल्याने तो वैफल्यग्रस्त झाला असून, तीन दिवसांपासून मनोरुग्णासारखा वागत आहे. मंगळवारी सातारा येथील त्याच्या मित्रांना त्याला घेऊन जाण्यासाठी कळविले होते. त्यानुसार बुधवारी त्याचे मित्र त्याला नेण्यास आले होते. मंगळवारीच त्याने शिराळा पोलिसांत अज्ञात व्यक्ती आपला पाठलाग करीत असून, आपल्या जीवीतास धोका आहे, अशी तक्रार दिली होती. जीवीतास धोका असल्याच्या भीतीपोटी तो संरक्षणासाठी मोटारीत कोयता ठेवत होता.