शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

सातारा : पाच दिवसांत उसाचा दर कारखान्यांच्या नोटीस बोर्डांवर लावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:16 IST

शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.

ठळक मुद्देपाच दिवसांत उसाचा दर कारखान्यांच्या नोटीस बोर्डांवर लावा सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीच्या सूचना; दराबाबत निर्णयच नाही

सातारा : शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारीश्वेता सिंघल यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी संघटना व कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासीउपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सागर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीच्या सुरुवातीला विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मुद्दे मांडले. बैठकीच्या सुरुवातीलाच मागील वर्षी झालेल्या चर्चेचा इतिवृत्तांत प्रतिनिधींनी मांडला.

त्या बैठकीमध्ये कारखानदारांच्या प्रतिनिधींनी जाहीर केल्यानुसार उसाला दर दिले नाहीत. त्याबाबत काय कारवाई केली? अशी विचारणा प्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यावर ही बैठक समन्वयासाठी घेतली आहे. दराबाबत निर्णय घेण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सुरुवातीलाच केले.दरम्यान, ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे जाहीर केलेला दर दिला नाही, त्या कारखान्यांना पुढील हंगामासाठी गाळप परवाने दिले जाऊ नयेत, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू केले जाऊ नयेत, कारखाने कुठलाही परवाना न घेता अथवा दर जाहीर न करता कायद्याचा भंग करून साखर गाळप करतात, त्यांना पोलिसांकडून अभय दिले जाते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, आदी मुद्दे प्रतिनिधींनी मांडले.जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने हे सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. कारखाने बंद ठेवून शेतकऱ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारखाने सुरू राहिले पाहिजेत. शेतकरी संघटनांनी कारखान्यांच्या वार्षिकसभेत दराचा निर्णय घेण्याबाबत आग्रह धरला पाहिजे, अशी भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मांडली. त्यावर सभांमध्ये शेतकरी सभासदांना आपली बाजूच मांडायला दिली जात नसल्याची व्यथा अनेकांनी मांडली.या बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कदम, सागर कुंभार, अर्जुन साळुंखे, अनिल बाबर आदींसह संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय

  1.  कारखाना व्यवस्थापनांनी तत्काळ दरासंदर्भात बैठक घ्यावी
  2.  नोटीस बोर्डावर दर जाहीर करावा
  3.  कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असल्याने त्यांना विश्वासात घ्यावे
  4. सर्व ऊस उत्पादकांना सारखा दर द्यायला पाहिजे
  5. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कारखान्यांचीही
  6. कारखान्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कक्ष निर्माण करावा

सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत आहे. कारखान्याची बिले वेळेत मिळाली नाहीत तर बँका, सोसायट्या शेतकऱ्यांना सोडतात का? पैसे नसले तरी कर्जाची प्रकरणे नवी-जुनी करावी लागतात. रतन खत्रीने आकडे जाहीर करावेत, तसे कारखानदार आकडे जाहीर करतात. कारखान्यांनी उसाच्या देण्यापोटी १८ टक्के व्याज दिले पाहिजे.- शंकर गोडसे, शेतकरी संघटना 

साखर कारखाने मागील वर्षीच्या रिकव्हरीवर दर जाहीर करतात. एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी आम्ही करतोय. कायद्यानुसार उसाला दर देणे हे कारखानदारांवर बंधनकारक असताना मागील देणी थकविली जातात. दर जाहीर करण्याआधीच कारखाने सुरू करून कारखानदार पहिल्यांदा कायदे मोडतात. मात्र, शेतकरी सभासदांचे पैसे मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. वाळू माफियांपेक्षा डेंजर  हा प्रकार आहे.- संजय भगत, रयत क्रांती संघटना

केंद्र शासनाने एफआरपीचा बेस ९.५ वरून १०.५ करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असून, ९.५ रिकव्हरी बेस पकडून दर दिला पाहिजे, यासाठी आम्हाला शासनाविरोधात लढा द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसल्यास कारखानदार आणि संघटनांची ताकद मिळून शेतकऱ्यांना गुडघ्याला टेकणे भाग पडू शकते.- सचिन नलवडे, स्वाभिमानी

 

जोपर्यंत उसाचा दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत एकही कारखाना चालू करू देऊ नका, मागील वेळी आमिष दाखवून ऊस नेला. खताचा, विजेचा, औषधांचा खर्च वाढलेला असताना शेतकऱ्याला तसा मोबदला मिळालेला नाही. जोपर्यंत दराबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू नका.- राजू शेळके, स्वाभिमानी

 

जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीत ऊस दरासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र कारखान्यांचे चेअरमन तसेच जबाबदार अधिकारी बैठकीला आले नाहीत. आम्हाला मोठेपणाची हौस नाही. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांसाठी आम्हाला कारखान्यांच्या पायऱ्यांवर बसावे लागते. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांचे करोडो रुपये मिळाले आहेत.- पंजाबराव पाटील, बळीराजा संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर