शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बनणार ‘एलईडी सिटी’

By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST

पुणे विभागात पहिलाच उपक्रम : पालिकेची वर्षाला होणार सत्तर लाखांची बचत---लोकमत विशेष...

दत्ता यादव - सातारा   -बल्ब, ट्यूब ते ‘एलईडी’ व्हाया सोडीयम व्हेपर असा साताऱ्यातील पथदिव्यांचा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे. सध्या संपूर्ण शहरामध्ये ‘एलईडी’ दिवे बसविण्यात येणार असून, यामुळे आता सातारची ‘एलईडी सिटी’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, सातारा पालिकेचा हा पुणे विभागातील पहिलाच उपक्रम असून, वर्षाला तब्बल पालिकेची सत्तर लाखांची बचत होणार आहे.पालिकेच्या वतीने तिजोरीमध्ये बचत होण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सातारा ‘एलईडी सिटी’ करण्याचा. पूर्वी शहरामध्ये काही ठिकाणी सहा फुटांचे लोखंडी पथदिवे होते. या पथदिव्यावर एक छोटासा मिणमिणता बल्ब लावला जात होता. मात्र काळाच्या ओघात हे लोखंडी दिवे नामशेष झाले. उरल्या केवळ फक्त आठवणी. आजही काही लोक या लोखंडी खांबाकडे कुतूहलाने पाहतात. सध्या शहरामध्ये सुमारे पाच हजार पथदिवे आहेत. काही ठिकाणी १५० वॉटचे अडीच हजार बल्ब आहेत. तर अडीचशे वॉटचे एक हजार दिवे आहेत. या एका बल्बची तब्बल साडेसहा हजार रुपये किंमत आहे. त्यामुळे हा बल्ब गेला तर त्याचा देखभाल खर्च जास्त होतो. साधारण सहा महिन्यांपर्यंत हा बल्ब टिकतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे वीजबिलापोटी पालिकेला महिन्याला तब्बल बारा लाख रुपये भरावे लागत आहेत. म्हणजे, वर्षाला तब्बल एक कोटी ४४ लाख रुपये केवळ वीजबिलासाठीच खर्च होतायत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. सध्या वीजबचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर सर्रास ठिकाणी केला जातो. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार असला तरी यातून पालिकेची आर्थिक बचत होणार आहे. शहरामध्ये एलईडी दिवे बसविल्यास वर्षाला तब्बल सत्तर लाखांची बचत होणार आहे. एलईडी दिवे हे कमी वॉटचे असतात. साठ ते ऐंशी वॉटचा दिवा जरी लावला तरी त्याचा प्रकाश चांगला पडतो. या दिव्यांचे वीजबिलही जास्त येत नाही. चाळीस ते साठ टक्के वीजबिल बचत होणार आहे. त्याचा देखभालीचा खर्चही कमी असतो. त्यामुळे सध्या एलईडी दिवे बसविण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. काही जिल्ह्यांत व ग्रामीण भागामध्ये सध्या एलईडी दिवे दिसून येत असले तरी संपूर्ण शहर एलईडीने युक्त होणारे पुणे विभागातील सातारा हे पहिलेच शहर ठरणार आहे. ‘बीओटी’चा प्रस्ताव !सातारा सिटी एलईडी करण्यासाठी सुरुवातीला पालिकेला खर्च झेपणार नाही. त्यामुळे बीओटी तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संबंधित कंपनीला मिळणाऱ्या उत्पनातील काही वाटा पालिकेलाही मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना पालिकेला फारशा अडचणी येणार नाहीत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शहरामध्ये ४८ मीटर बॉक्स आहेत. त्याच्यावर दिव्यांचे जादा कनेक्शन लावण्यात आले आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन वरचेवर लाईट बंद पडत आहेत. एलईडी दिव्यांमुळे त्या आता पडणार नाहीत. -अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा‘एलईडी’चे काय फायदे१) वीजबिल आता येतय त्यापेक्षा निम्म्याहून कमी येईल२) देखभालीचा खर्च वाचणार३) व्होल्टेज वाढले तरी बल्ब जाणार नाहीत४) शॉर्टसर्किट होणार नाही५) मीटरवर लोड कमी येणार