शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साता-यात कंटेनर अपघाताला गंभीर वळण

By admin | Updated: February 11, 2016 14:35 IST

पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणा-या तरूणांना कंटेनरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन तरूण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ११ - पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणा-या तरूणांना कंटेनरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन तरूण ठार तर दोघेजण जखमी झाले. मात्र या अपघाताला आता गंभीर वळण मिळाले आहे. अपघातानंतर बराच वेळ पोलिस न आल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलीस गाडीवर दगडफेक केल्यानंतर फौजदाराने जमावार पिस्तुल रोखल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. 
साता-यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर रेल्वे गेटजवळ गुरूवारी सकाळी धावण्याचा सराव करणा-या चार तरूणांना कंटेनरची धडक बसल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. पोलीस भरतीसाठी चार युवक पहाटेपासून सातारा- लोणंद रोडवर धावण्याचा सराव करत होते. मात्र देऊर रेल्वे गेटजवळ त्यांना कंटनेरची जोरदार धडक बसली. अपघातात जबर जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोन जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून घटना घडून गेल्यानंतर ब-याच   उशीरा आलेल्या पोलिस गाडीवर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केली. त्यांना रोखण्यासाठी फौजदाराने जमावार पिस्तुल रोखली. तरूणांच्या मृत्यमुळे आधीच संतापलेला जमाव या घटनेमुळे आणखीनच भडकला आणि या फौजदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ग्रामस्थांनी दोन्ही तरूणांच्या मृतदेहांसह शववाहिका ग्रामपंचायत कार्यालयासमोरच लावल्याने तणावात आणखी भर पडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. अखेर त्या फौजदारावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.