शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एकरभर मेथीच्या शेतात फिरविला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

आदर्की : फलटण पश्चिम भागात बागायती क्षेत्र वाढले असले, तरी भाजीपाला पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. असेच ...

आदर्की : फलटण पश्चिम भागात बागायती क्षेत्र वाढले असले, तरी भाजीपाला पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. असेच बिबी येथील शेतकऱ्याने मेथीच्या भाजीला दर नसल्याने एक एकरातील मेथीच्या भाजीवर रोटावेटर फिरवला आहे.

फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडीचे पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली; पण साखर कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी उसाला पर्याय म्हणून भाजीपाला क्षेत्राकडे वळला आहे. पण भाजीपाला पिकास हमीभाव नसल्याने कधी सोन्याचा भाव, तर कधी अगदीच अल्प किंमत येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. बिबी (ता. फलटण) येथील शेतकरी चंद्रकांत बोबडे यांनी जून महिन्यात कांद्याची लागवड केली. परंतु कांदा काढतेवेळी अतिवृष्टी झाल्याने कांदा पिकात पाणी साचून नुकसान झाले. त्याच शेतात गत महिन्यापूर्वी ३० किलो मेथीचे बी टाकून, पाण्याच्या दोन पाळ्या दिल्या. मेथीच्या पेंडीला तीन रुपये दर व्यापारी सांगत होते, तर मेथीची भाजी काढणे, बांधणी, वाहतूक याचा खर्च तीन रुपये व मेथीचे बी, मशागत, खते वेगळा खर्च होतो. त्यामुळे मेथीची भाजी विकणे परवडत नसल्याने त्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर मारून जमिनीत गाडली आहे.

चौकट

कोणतीही भाजी दोन ते तीन रुपये पेंडी...

बाजारात भाजीपाल्याला दर असला तरी, शेतकऱ्याकडून दोन ते तीन रुपये पेंडी या दराने भाजीपाला घेतला जातो. नवीन बटाटा -१८ रु. किलो, टॉमेटो -१० रु., कोबी १० रु. गड्डा, फ्लॉवर १० रु. गड्डा, मिरची ४० रु., पावटा ३० रु., वालघेवडा २० रु. किलो असा दर आहे.

कोट...

जुलै महिन्यात लाल कांद्याची पेरणी केली. भांगलण, खते, औषधे यावर खर्च करून पीक चांगले आले; त्यावेळी दरही चांगला होता; पण चार दिवस सलग अतिवृष्टी होऊन कांदा शेतातच नासला. त्यानंतर तीस किलो मेथी बी टाकले. त्यावेळी पंधरा रुपये पेंडी दर होता. आता काढतेवेळी तीन रुपये पेंडी असा दर झाल्याने मेथीवर रोटावेटर फिरवला आहे.

- चंद्रकांत बोबडे, बिबी, ता. फलटण

०४आदर्की

फोटो -बिबी (ता. फलटण) येथील मेथी भाजीच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर फिरवण्यात आला आहे.