शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मूळकुज, बुरशीने कांद्याचे तराव जळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST

पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांदा रोप (तराव) निर्मितीसाठी कांद्याचे बी टाकले. ...

पुसेगाव : रब्बी हंगामात कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्या शेतात कांदा रोप (तराव) निर्मितीसाठी कांद्याचे बी टाकले. यापासून रोपे उगवून आली असली, तरी मूळकुज व बुरशीमुळे ती रोपे जळून जात असल्याने पुसेगावसह परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.

खरिपाची सुगी झाल्यानंतर मोकळ्या शेतात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्यावर्षीच्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने यंदाही शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वत:चे कांदा बी, तर काही जणांनी बी विकत आणून त्यापासून कांदा रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक किलो कांद्याच्या बीचा भाव चार ते पाच हजार रुपये आहे, तर एक एकर कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार किलो बी टाकणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके काढणीला येताच कांद्याची रोपे (तराव) टाकली आहेत. मात्र, सततच पाऊस व खराब हवामानामुळे रोपे मूळकुज व बुरशी रोगामुळे जागेवरच जळून जात आहेत.

रोपांवर औषधांची फवारणी करूनदेखील तराव जळून जात असून, चार किलो बीच्या तरावात १० ते १५ गुंठे क्षेत्रावर कांदा लागण होत आहे. एवढे कष्ट घेऊनही शेतात टाकलेले तराव तरत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

(चौकट)

तरीही दराची शाश्वती नाही..

एक एकर कांदा लावणी करण्यासाठी शेतमजूर आठ ते नऊ हजार रुपये घेत आहेत. पुढे खते, औषधे, अंतर्गत मशागतीचा प्रचंड खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. म्हणजे शेतकऱ्यांने एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्चून उत्पादित केलेल्या कांद्याच्या पिकाच्या दराची शाश्वती नसते. त्यामुळे शेतकरी वगार्तून कांदा पिकाबाबत चिंता वाढू लागली आहे.

(कोट)

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या तरावाला पोषक वातावरण मिळत नसल्याने रोपे जागेवरच जळून जात आहेत. रोपाला लागवडी योग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक त्रासाबरोबर कष्ट घ्यावे लागत आहेत. कांद्यासाठी ठेवलेले क्षेत्र स्वत:च्या तरावाने पूर्ण होत नसल्याने इतर ठिकाणांहून कांद्याचे तराव आणावे लागत आहे. मात्र, त्याचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.

- अविनाश रणसिंग, रणसिंगवाडी

फोटो : २० पुसेगाव

पुसेगाव येथे कांद्याच्या तरावाचा बुरशी व मूळकुज रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकरी रोपांवर औषध फवारणी करीत आहेत. (छाया : केशव जाधव)