शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-प्रशासनाची भूमिका एकच हवी!

By admin | Updated: May 24, 2016 00:58 IST

अश्विन मुदगल : देसाई कारखान्यावर जाहीर सत्कार

पाटण : ‘तालुक्यातील जनतेच्या समस्या, तक्रारी आणि रस्त्यांच्या कामांविषयी सततचे फोन आणि पाठपुरावा पाटणचे आमदार शंभूराज देसाई करतात. रोजच त्यांचा माझ्यामागे ससेमिरा असतो. आमदार देसार्इंच्या कामाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. आमदार आणि प्रशासन यांची भूमिका एकच असेल तर विकासाचा गाडा व्यवस्थित चालतो,’ असे मत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.दौलतनगर, ता. पाटण येथे देसाई साखर कारखाना व आमदार शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘उपलब्ध निधी आणि तरतुदीमध्ये जिल्ह्यातील लोकांचा कसा फायदा होईल याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. पश्चिमेकडे जास्त पाऊस तर पूर्वेकडील तालुके कोरडे. सध्या पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील. यूपीएससी परीक्षेच्या निकालानुसार महाराष्ट्राची फक्त १० टक्के मुले यशस्वी झाली. यापुढे ५० टक्के मुले मराठी म्हणून अधिकारी पदावर पोहोचायला पाहिजेत.’ अश्विन मुदगल यांनी जलयुक्त शिवार योजनेचे काम जीव ओतून राबविल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव आदर्श जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.’(प्रतिनिधी)मराठीतून बोलण्याचा आटोकाट प्रयत्नजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सकारात्मक उत्तर देताना मराठी भाषेतून बोलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भाषणातून त्यांनी उपस्थित अधिकारी वर्ग व तालुक्यातील जनतेची मने जिंकली. मात्र, जिल्हाधिकारी कोणत्या गावचे कोणत्या राज्यातील याची माहिती न मिळाल्याने उपस्थितांमध्ये आतुरता राहून गेली.दुष्काळ निवारणासाठी पाटण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने १ लाख ८० हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचेकडे सुपूर्द केला.कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पराग सोमण, उपविभागीय अधिकारी धनाजी पाटील, देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, डॉ. दिलीपराव चव्हाण आदी उपस्थित होते. अ‍ॅड. डी. पी. जाधव यांचे भाषण झाले.