शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदावला; पण कडमडली वाहनं!

By admin | Updated: June 13, 2016 00:18 IST

मलकापुरात अपघाताची भीती : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरच अवजड वाहनांचे पार्किंग; शेकडो दुचाकीही रस्त्यावर; दुर्घटनेची भीती

मलकापूर : अपघात किंवा वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी रस्त्याचे रुंदीकरण केले जाते. मात्र, कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून या रस्त्याला पार्किंगचे ग्रहण लागले आहे. ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग परिसरात वाहने रस्त्यावरच पार्क केलेली आढळून येतात. एका कंपनीच्या आठ ते दहा खासगी बस दिवसभर रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. तसेच दुचाकी पार्किंगमुळेही रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता आगाशिवनगर परिसरातून जातो. या भागात नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात घडत असल्यामुळे रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ३ कोटी ४० लाखांचा निधी मिळाला. ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग या २ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. दुभाजक निर्मिती करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तुलनेत अपघाताचे प्रमाणही कमी झाले. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावरचं पार्किंग होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संपूर्ण ढेबेवाडी खोऱ्यातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या अस्ताव्यस्त पार्किंगचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आगाशिवनगर येथील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीत ये-जा करण्यासाठी सावकार मोटर्स या ट्रॅव्हल्स् कंपनीने ठेका घेतलेला आहे. महिला उद्योग पासून इतरत्र कर्मचारी कामास जातात. त्यांच्या सोयीसाठी ठेका घेतलेल्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स् महिला उद्योग परिसरात कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरचं तासन्तास पार्किंग करण्यात येतात.महिला उद्योग ते पुढे ढेबवाडीकडे रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वाहने वेगात असतात. अशावेळी रस्त्याच्या एका लेनवर जर पार्किंग केलेली वाहने उभी असल्यामुळे लहान-लहान अपघातही घडले आहेत. मोठा अपघात घडू नये म्हणून ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग परिसरातील पार्किंगबाबत पर्यायी व्यवस्था करावी, अशा रस्त्यावरील पार्किंगबाबत पोलिस खातेही उदासिन असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी) ट्रकही रस्त्यावर उभे आगाशिवनगर परिसरात दत्त मंदिर ते झेड.पी. कॉलनी परिसरात अनेक ट्रक व्यावसायिक आहेत. रात्रीच्या वेळी या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच ट्रकचे पार्किंग केलेले असते. त्यामुळे अपघात घडत आहेत. एकच दिवस कारवाईकृष्णा सरिता बझारसमोर रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच दुचाकी पार्किंगच्या रांगा लागलेल्या असतात. या चौकातून एखाद्या मंत्र्यांचे येणे-जाणे असते. अशावेळी एकच दिवस पोलिसांकडून नो पार्किंगची कारवाई करण्यात येते. बाकीच्या दिवशी कारवाई करणाऱ्या पोलिसांसमोरचं राजरोसपणे पार्किंग व वडाप सुरू असते.