शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे ते सासपडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. नागठाणे-सासपडे रस्त्यावर सध्या ...

सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे ते सासपडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. नागठाणे-सासपडे रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवत कसे जायचे, हा प्रश्न सतावत आहे.

चौकात अस्वच्छता

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री हाच कचरा विस्कटतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

रस्त्यावर स्टंटबाजी

सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाकी बेफामपणे चालवत येत असतात. तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात.

वाहनांचे नुकसान

सातारा : सातारा-कास रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटातून कास मार्ग जातो. या मार्गावर घाटातही जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तसेच साईडपट्ट्याही खचल्या आहेत, तर कासकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. चऱ्या पडल्या आहेत.

कुत्र्यांचा उपद्रव

सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

अस्ताव्यस्त पार्किंग

सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात; पण अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही. त्यावेळी नागरिक कशाही पद्धतीने दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाडी बाहेर काढता येत नाही.

वृक्षारोपणाची मागणी

सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करणयात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरून जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे पाडण्यात आली. रस्त्याच्या बाजूला झाडे दिसतात.

ऊसतोडणीला वेग

सातारा : साताऱ्यासह बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या ऊसतोड सुरू असल्याचे दिसत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होते. सध्या अनेक कारखाने सुरू झाले आहेत.

माहुली रस्ता खड्डेमय

सातारा : क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.