शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा पळणार की पतंग उडणार ?

By admin | Updated: June 2, 2016 01:03 IST

प्रचाराच्या तोफा थंडावल्या : ‘भागधारक की परिवर्तन ?’... कौल १९ हजार ७७ हजार मतदारांच्या हाती !

सातारा : जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या साताऱ्यातील जनता सहकारी बँकेसाठी सत्ताधारी भागधारक व परिवर्तन या दोन पॅनेलमध्ये घमासान रंगली आहे. दोन्ही बाजूंनी गेल्या काही दिवसांत प्रचाराचा धुरळा उडविण्यात आला. एकमेकांचे मुद्दे खोडून काढत परस्परांचे वाभाडेही काढले गेले. आता भागधारकची रिक्षा पळणार की परिवर्तनचा पॅनेल हवेत उडणार?, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सातारची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जनता बँकेची निवडणूक ही नगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम ठरली आहे. पालिका राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारी मंडळीच बँकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आरोपांची जुगलबंदी रंगली आहे. बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत, यापैकी बहुतांश मंडळी सातारा पालिकेचे आजी अथवा माजी पदाधिकारी आहेत. या निवडणुकीत विनोद कुलकर्णी, अ‍ॅड. मुकुंद सारडा यांचे सत्ताधारी भागधारक पॅनेल विरुद्ध प्रकाश गवळी, डॉ. अच्युत गोडबोले यांचे परिवर्तन पॅनेल उभे ठाकले आहे. दोन्ही पॅनेलमध्ये कधी-काळी टोकाचे विरोधक असणाऱ्या मंडळींनी गळ्यात गळे घातल्याचे चित्र आहे. सातारा शहराच्या सत्तेवर प्राबल्य असणाऱ्या सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीचे अनेक हुकमी एक्क्यांनी तह केल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत जनता बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठी उलथापालथ झाली. निवडणुकीसाठी दाखल झालेले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने १८ जण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले. २१-२१ चे दोन तुल्यबळ पॅनेल उभे ठाकले. दोन्ही बाजूंनी पॅनेल टू पॅनेल मतदान होणार का?, मतदार पुन्हा संमिश्र कौल देणार? याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी) ..आता खोबऱ्यावरच्या कुस्त्यांतच निकाल नगरपालिका निवडणुकीमध्ये संभावित प्रतिस्पर्ध्यांची झुंज जनता बँकेच्या निवडणुकीत होत आहे. थोडक्यात जनता बँकेतील खोबऱ्यांच्या कुस्त्यांमधील निकालानंतर नगरपालिकेच्या मैदानात इनामी कुस्तीसाठी पुन्हा झुंजी होणार आहेत. जनता बँकेसाठी आज ४७ केंद्रांवर मतदान सातारा : येथील जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. २ रोजी ४७ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. या बँकेचे १९ हजार ७७ इतके मतदार आहेत. मतदान होणाऱ्या शहर व तालुक्यातील केंद्राची नावे : नवीन मराठी शाळा (भवानी पेठ), नवीन मराठी शाळा (सदाशिव पेठ), इंग्लिश मीडियम स्कूल -दातार शेंदूर इंग्लिश मीडियम स्कूल (प्रतापगंज पेठ), श्री खडकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची नवीन प्राथमिक शाळा , आण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यामंदिर, हत्तीखाना (सोमवार पेठ). ज्ञानदीप विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्र. १६ (बुधवार पेठ), स्फूर्ती विद्या मंदिर, नगरपालिका शाळा क्र. ८ (गुरुवार पेठ), स्फूर्ती विद्या मंदिर - शिर्के शाळा (गुरुवार पेठ, माची पेठ, दुर्गा पेठ), शांती विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्र. ७ (शुक्रवार पेठ), कन्याशाळा राजपथ, भवानी पेठ (शनिवार पेठ), महात्मा फुले ज्यु. कॉलेज आॅफ एज्यु. कर्मवीर भाऊराव पाटील समाधी परिसर (रविवार पेठ, पंताचा गोट, पोवई नाका), जि. प. प्राथमिक शाळा शाहूपुरी, श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्यु. कॉलेज, तक्षशीला विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्र. २०, अण्णासाहेब कल्याणी विद्या मंदिर, जि. प. प्राथमिक शाळा, कोडोली लोकमंगल हायस्कूल (एमआयडीसी), गोकूळ प्राथमिक शाळा, कृष्णानगर अनंत इंग्लिश स्कूल, आबासाहेब चिरमुले विद्या मंदिर, चिमणपुरा पेठ, भवानी विद्या मंदिर, गुरुवार पेठ, शारदाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा, जकातवाडी, जि. प. प्राथमिक शाळा, कोंडवे जि. प. शाळा, वाढे जि. प. शाळा वडूथ, जि. प. शाळा नागठाणे, जि. प. शाळा, चिंचणेर वंदन, वसंतदादा पाटील विद्यालय (रहिमतपूर), जि. प. शाळा (कोरेगाव), जि. प. शाळा (मेढा), जि. प. शाळा, जावली (जावली तालुका), नगरपालिका शाळा क्र. ३ कऱ्हाड पोस्टाशेजारी (पाटण, कऱ्हाड), जि. प. शाळा क्र. १ भुर्इंज, हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज, हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज, नगरपालिका शाळा क्रमांक ५, गंगापुरी जि. प. शाळा (मुलांची) नं. २, लोणंद, शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळा, जिल्हा क्रीडा संकुलासमोर (पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सोलापूर, महाड). (प्रतिनिधी)