शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साहित्यातील समीक्षा सिद्धांत आश्रित बनलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:00 IST

सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये ...

सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी रा.भा. पाटणकर व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, किशोर बेडकिहाळ, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, सोपानकाका चव्हाण, प्रा.आर. एस. काळे, डॉ. अनिसा मुजावर आणि मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे काय झाले आहे? हे आपण पाहतो आहोतच. तिच्यातील उदारमतवादी दृष्टिकोनामुळे तत्वज्ञानासह मानव शास्त्रांचे अस्तित्व कसेबसे तग धरून होते. जागतिकीकरण, बाजार, शिक्षणाचे खासगीकरण, कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणांना आलेले महत्त्व या सर्व घटकांना दिलेल्या महत्त्वामुळे समीक्षेला, चिकित्सा करण्याला, विचार करण्याला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राने पूर्णपणे झटकून टाकली आहे.’संमेलनासाठी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, सहनिमंत्रक राजन लाखे, वि. दा. पिंंगळे, प्रा. तानसेन जगताप, शिरीष चिटणीस, पुरुषोत्तम काळे, दिनकर झिंब्रे, रावसाहेब पवार, मसाप पुणेचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी, शिवाजी कॉलेज मराठी विभाागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, साताºयातील साहित्यप्रेमी, वाचक नागरिक मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होते.संमेलन यशस्वी होण्यासाठी मसाप शाहूपुरी शाखेचे कार्यकारिणी कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाहक अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, कार्यवाहक डॉ. उमेश करंबळेकर, कोषाध्यक्ष राजेश जोशी, प्रवीण पाटील, सुभाषचंद्र सरदेशमुख, संजय माने, अमर बेंद्रे, दीपाली धुमाळ, फातिमा नदाफ, स्थानिक संयोजन समितीचे समन्वयक प्रा. गजानन चव्हाण, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. कांचन नलवडे, सहसंयोजक डॉ. मानसी लाटकर, डॉ. संजयकुमार सरगडे, प्राचार्य सीताराम गोसावी यांनी परिश्रम घेतले.स्रेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.मराठीला अभिजात दर्जासाठी लढा‘मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या सहा वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबवले असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. मिलिंद जोशी आणि रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला,’ अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी दिली.