शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त वनअधिकाऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST

मद्य आणि कीटकनाशकाचे मिश्रण प्राशन केल्याचा संशय

कोरेगाव : शहरातील एका लॉजच्या खोलीत निवृत्त उपवनसंरक्षक भारत दशरथ पारखे (वय ६२, रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव) यांचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. पारखे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे न समजू शकल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पारखे हे मूळचे हातीद, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील रहिवासी होते. त्यांनी वनसेवेत असताना गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथे फार्म हाउस बांधले होते. सातारा येथे उपवनसंरक्षक आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना ते नेहमीच गोगावलेवाडी येथे वास्तव्यास असत. नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक म्हणून ते निवृत्त झाले. अधून-मधून ते गोगावलेवाडी येथे येत होते. बुधवारी सकाळी ते गोगावलेवाडी येथील फार्म हाउस येथे गेले होते. त्यानंतर रात्री ११ वाजता कोरेगावात आले आणि आझाद चौकातील एका लॉजमध्ये खोली घेतली होती. तेथे दोन दिवस त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी लॉजच्या कर्मचाऱ्यांना ‘सकाळी सहाला मला उठवा,’ असे त्यांनी बजावले होते. त्यावेळी त्यांनी मद्यपान केले होते. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी सहाला त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना वाटले पारखे हे अजून झोपेत असावेत म्हणून त्यांनी पुन्हा एका तासाने दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने अखेरीस व्यवस्थापक दिलीप घोरपडे याने मालकाला याची कल्पना दिली. त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.याप्रकरणी लॉजचे व्यवस्थापक दिलीप घोरपडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. हवालदार बी. आर. यादव व पोलीस नाईक राहुल गायकवाड तपास करत आहेत. (प्रतिनिधी)झोपलेल्या अवस्थेत मृतदेह !पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन पाहणी केली असता, खोलीचा दरवाजा आतून कडी लावून बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर पारखे यांचा झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. खोलीची तपासणी केली असता, त्यामध्ये मद्याच्या बाटल्या आणि कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. पारखे यांनी मद्यामध्ये कीटकनाशक मिश्रण करून प्राशन केले असावे, असा पोलिसांना संशय आहे.