शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायदे रद्दसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द होईपर्यंत आरपारची लढाई सुरूच राहणार आहे,’ असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सातारा शहरातून रॅली काढण्यात आली.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या नावाखाली लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी विषयक तीन कायदे केलेले आहेत. या कायद्यामुळे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमीभाव, तसेच शेतकरी हिताच्या अनेक बाबींवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर परिणाम होणार आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हळूहळू उद्ध्वस्त होणार आहे. हे अन्यायकारक कायदे केंद्राने मागे घ्यावेत, यासाठी जवळपास ५० हून अधिक दिवसांपासून शेतकरी दिल्लीत हाल, उपासमार सोसत धरणे आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायाशी निगडित प्रत्येकाने शेतकऱ्याच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. या गोष्टीची जाणीव ठेवूनच राष्ट्रीय किसान मोर्चाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.

दि. ११ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन १६ रोजी संपले. त्यामुळे रविवारी सातारा शहरातून रॅली काढून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली, असे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

या रॅलीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बोराटे, प्रा. डॉ. ए. जी. होवळ, रफिक मुलाणी, विजय काटरे, अमृत सूर्यवंशी, प्रकाश काशीळकर, सुमीत डांगे, आदेश शिंदे, सौरभ खरात, अशफाक शेख, तेजस माने, विनोद लादे, किशोर थोरवडे, कुमोद खरात, हंबीरराव बाबर, अ‍ॅड. विक्रांत संघमित्र, मयूर थोरवडे, रोहित संकपाळ, एम. ए. आढाव, सोनाली नितनवरे, संध्या शिर्के, लता बनसोडे, आदी सहभागी झाले होते.

फोटो दि.१७ सातारा राष्ट्रीय किसान मोर्चा...

फोटो ओळ : सातारा शहरातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली होती.

.................................................