शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

गळती काढा, नंतर पाणी कपातीचे बघा

By admin | Updated: February 12, 2016 23:38 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना : कास तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट

सातारा : ‘पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने कास धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पाणी कपात अटळ असली तरीही पाणीपुरवठा विभागाने आधी शहरातील जलवाहिन्यांची गळती काढून पाणी बचत करावी,’ अशी सक्त सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीपुरवठा सभापतींसह विभागालाही केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सर्वत्रच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता फेब्रुवारी महिना सुरू असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची पाणीपातळी खालावली आहे. साहजिकच सातारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसासाठी अजून चार-पाच महिने अवधी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी सातारकर नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. दरम्यान, सातारा शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून हजारो-लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सातारा पालिकेने गळती काढण्याचे काम गांभीर्याने केल्यास वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. पर्यायाने नागरिकांनाही जास्त दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने शहरातील जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी प्राधान्य देऊन गळती कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. किमान पावसाळा सुरू होईपर्यंत तरी, सातारकरांना पाणी उपलब्ध राहील. त्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आत्तापासूनच काळजी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) प्राधिकरणाचे पालथ्या घड्यावर पाणी...पालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांनाही मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र आहे. मात्र, प्राधिकरणाला सांगून काहीही उपयोग होणार नाही. त्यांचे काम म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, असेच आहे. इतक्या वर्षात एकाही जलवाहिनीची गळती काढण्यात त्यांना यश आले नाही की, पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही. त्यामुळे आता सांगूनही त्यांच्याकडून काहीही होणार नाही. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची गळती काढण्याचेही काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच करावे, अशी सूचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.