शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांना दिलासा : कृती समितीकडे सातशे तक्रारी दाखल

By admin | Updated: November 17, 2014 23:51 IST

सातारा जिल्ह्यातून आठशेहून अधिक तक्रारी अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीकडे दाखल झाल्या आहेत.

सातारा : गेले पंधरा दिवस बंद असलेले ‘पर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सातारा येथील कार्यालय सोमवारी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांना थोडे हायसे वाटले. दरम्यान, ‘पर्ल्स’च्या आर्थिक व्यव्हारावर ‘सेबी’ने निर्बंध आणल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील की नाही, याविषयी अजूनही सांशकता आहे. ‘पर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’ तथा ‘पीएसील’ने जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांना ठकवले आहे. यामध्ये अडकून पडलेली रक्कम जवळपास सहाशे कोटींच्या आसपास आहे. या कंपनीच्या विरोधात गेले पंधरा दिवस झाले जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, सातारा जिल्ह्यातून आठशेहून अधिक तक्रारी अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीकडे दाखल झाल्या आहेत. यासाठी विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली असून, अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत, सर्जेराव पाटील, मिलिंद कासार, चाँदगणी आत्तार आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये कार्यरत आहेत. या तक्रारी गणेश पाटणे आणि सातारा येथील माजी सैनिक चंद्रकांत घाडगे तसेच त्यांचे सहकारी तक्रारी लिहून घेत आहेत.सोमवारी ‘पर्ल्स’चे कर्मचारी नियोजित वेळेनुसार कार्यालयात दाखल झाले. यावेळी ठेवीदारांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचवेळी गणेश पाटणे आणि त्यांचे सहकारी येथे ठेवीदारांच्या तक्रारी लिहून घेत होते. पर्ल्सच्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाटणे यांना येथून बाहेर जाण्यास सांगितले. पाटणे येथून खाली आले आणि त्यांनी खालीच तक्रारी घेण्यास सुरुवात केली. मात्र, कंपनीच्या काही एजंटानी त्याला धमकावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पर्ल्सचे जिल्हा कार्यालय सोमवारी उघडल्यामुळे ठेवीदारांना हायसे वाटले तरी पैसे परत मिळतील का नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)