शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयकुमार गोरेंचा जामीन फेटाळला

By admin | Updated: January 9, 2017 21:38 IST

सोशल मीडियावरून विनयभंग केल्या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयापाठोपाठ सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला.

आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 09 - सोशल मीडियावरून विनयभंग केल्या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयापाठोपाठ सोमवारी उच्च न्यायालयानेही फेटाळला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्यासाठी केलेला अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
सातारा येथील एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर जयकुमार गोरे यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांनी अर्ज केला होता. जयकुमार गोरे यांच्या वतीने अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यात फिर्यादीकडूनही मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आपण कुठल्याही मोबाईलवरून मेसेज पाठवले नसल्याचे शपथपत्र फिर्यादीच्या वतीने न्यायालयात दाखल केले. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आमदार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला. 
त्यानंतर या निर्णयावर अ‍ॅड. पाटील यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी आवश्यक मुदत हवी असल्याचा विनंती अर्ज केला. तोपर्यंत आ. गोरे यांना अटक न करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास द्यावेत, अशी मागणीही केली होती. यावेळीही दोन्ही बाजूंने विविध खटल्यातील निकाल युक्तिवाद म्हणून सादर केले गेले. त्यावर न्यायाधीश मोहिते यांनी ‘निर्णय होत नाही, तोपर्यंत आमदार गोरे यांना पोलिसांनी अटक करू नये,’ असे निर्देश दिले. त्यानंतर आमदार गोरे यांना उच्च न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी जाण्यास मुदत दिली होती. आ. गोरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला.