शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलीकडचं झालं; आता पलीकडचं कधी ?

By admin | Updated: February 2, 2015 00:04 IST

मात्र रस्त्याचे चौपदीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात आली. परंतु बसस्थानक हे वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे चांगला व्यवसाय होत होता

सातारा : काँग्रेसभवनाजवळ असलेली सर्व अतिक्रमणे हटविली. मात्र, एवढ्या दिवस या ठिकाणी बसूनही आम्ही कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, या कारवाईमध्ये सरळसरळ दुजाभाव दिसत आहे, असा आरोप करत व्यावसायिकांनी आता अलीकडचं अतिक्रमण काढलं; मात्र पलीकडचं कधी काढणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.बांधकाम विभाग आणि नगर पालिकेने शनिवारी बसस्थानकासमोरील अतिक्रमण हटविली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी लगेच काही ठिकाणी पुन्हा व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसून आले. बसस्थानकाशेजारी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी हातगाडे, छोटे-मोठे व्यावसायिक बसले होते. मात्र रस्त्याचे चौपदीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात आली. परंतु बसस्थानक हे वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे चांगला व्यवसाय होत होता. त्यामुळे रविवारी काही दुकानदारांनी त्याच ठिकाणी दुकान थाटले होते. इतर ठिकाणी मात्र शुकशुकाट होता. (प्रतिनिधी)पंपाच्याच जागेतून रस्ता : शहापोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोल पंप हटविण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने आग्रह धरण्यात आला होता. आज या पंपाच्या शेडचे पत्रे काढण्यास सुरुवात झाल्यामुळे पंपाचे मालक विपुल शहा यांच्याकडे याबाबत चौकशी केली. ते म्हणाले, ‘जुना महामार्ग करतानाच तो पेट्रोल पंपाच्या हद्दीतून करण्यात आला आहे. आजही या रस्त्याच्या खाली जुनी टाकी आढळून येईल. दुसरी टाकी बांधून आम्ही पंप पुन्हा सुरू केला होता. काल मी विवाह समारंभानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. वाद नकोत म्हणून इतरांनी शेडचे पत्रे उतरविण्यास सुरुवात केली. मात्र, आज मी आल्यावर हे काम थांबविले. जिल्हाधिकाऱ्यांसह १२ ना-हरकत परवाने घेऊन हा पंप सुरू करण्यात आला आहे. पूर्वीही तो अतिक्रमण म्हणून काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हापासूनच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’