शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

रयत क्रांती संघटना करणार कारखान्यांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व ...

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व कारखाना स्थळावर रयत क्रांती संघटनेतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

सन २०२०-२१ ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊसतोड करुन नेलेल्या ऊस बिलाची रक्‍कम एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना साताऱ्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु होऊन ९० दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्‍कम जमा केलेली नाही.

ऊस पिकावर सामान्य शेतकऱ्यांचा कौटुंबिक चरितार्थ व जीवनमान अवलंबून असताना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला एफआरपी देण्याचे आश्‍वासन देऊन ऊसतोड करत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची एफआरपीची रक्‍कम न दिल्याने येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना व्यवस्थापनामार्फत एफआरपीची रक्कम देण्यात यावी.

एफआरपीची रक्‍कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे, तरीसुध्दा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्‍कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही, याबाबत साशंकता वाटते, असे रयत क्रांती संघटनेतर्फे शंकर शिंदे, मुधकर जाधव, प्रकाश साबळे, दत्तात्रय फडतरे यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.