शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

रवींद्र गायकवाडने मारले ‘किसन वीर’चे मैदान

By admin | Updated: February 23, 2015 00:25 IST

किसन वीर चषक कुस्ती स्पर्धा : पांडुरंग मांडवेला पोकळ घिस्सा डावावर केले चितपट

भुर्इंज : येथील किसन वीर कारखान्यावर प्रचंड जल्लोषात पार पडलेल्या ‘किसन वीर’ चषक कुस्ती स्पर्धेत पै. रवींद्र गायकवाड याने पै. पांडुरंग मांडवे याला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून किसन वीरचे मैदान मारले. नारायण महाराज, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि एक लाख रुपये रोख पारितोषक देऊन गायकवाड याला गौरवण्यात आले. माणकाई देवीच्या यात्रेनिमित्त दोन दिवस सुरू असलेल्या या कुस्ती स्पर्धेची सांगता शनिवारी रात्री झाली. या स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात प्रणव शिवणकर, ३८ किलो वजनी गटात अक्षय चव्हाण, ४२ किलो वजनी गटात गणेश कणसे, ४६ किलो वजनी गटात निखिल इथापे, ५० किलो वजनी गटात साहिल कणसे, ५४ किलो वजनी गटात अक्षय फणसेयांनी अंतिम लढती जिंकल्या. तर महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचे सुपुत्र संग्राम पाटील व संदेश चव्हाण यांच्यात लावलेली कुस्ती बरोबरीत सुटली. यावेळी हिंद केसरी दादू चौगुले, विनोद चौगुले, बंडा पाटील रेठरेकर, बापू लोखंडे, संभाजीराव पाटील, नामदेवराव मुळे, विष्णू जोशीलकर, साहेबराव पवार, रामा माने, नजरुद्दीन नायकवडी, संतपराव पवार, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, नारायणराव पवार, प्रकाश निंबाळकर, रमेश सोनमळे आदी उपस्थित होते. मैदान यशस्वी पार पडावे यासाठी महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, पै. मधुकर शिंदे, पै. सतिश भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, पै. शेखर भोसले पाटील, पै. माणिक पवार, पै. राहुल शिंदे, पै. अरविंद नवले यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)लाख मोलाची मदतपसरणी येथील एकता दिलीप शिर्के या गरीब शेतकरी कु टुंबातील मुलीने राष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. शेतमजुराची ही मुलगी आर्थिक कारणास्तव मागे राहू नये, यासाठी मदन भोसले यांनी अवघ्या काही मिनिटांत जमा केलेला एक लाख एक हजार शंभर रुपयांचा निधी याच कार्यक्रमात एकताला प्रदान केला. तसेच पांडेवाडी येथील स्रेहल विष्णू मांढरे हिलाही या स्पर्धेतील कामगिरीबद्दल १५ हजारांचा निधी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.