शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील कोरोनावाढीचा दर अचानक घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून अचानक पणे कमी होऊ लागलेली आहे. रविवारी ९ हजार ८४२ ...

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून अचानक पणे कमी होऊ लागलेली आहे. रविवारी ९ हजार ८४२ चाचण्यांमधून ५७६ नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. कोरोना वाढीचा दर अचानकपणे ६.०७ टक्क्यांच्यावर खाली आला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रविवारी नेहमीच कमी चाचण्या होत असतात. त्यामुळे सोमवारी येणार अहवालात रुग्णांची संख्या कमी दिसते. मात्र मागच्या रविवारी तब्बल ९ हजार ८४२ इतक्या चाचण्या झाल्या. त्यातून ५७६ रुग्ण बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्यादेखील कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. मे महिन्यामध्ये जिल्ह्यात एका दिवसामध्ये २ हजार ६०० इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण आढळले होते. दर दिवसाला मृत्यूंची संख्या देखील ४० वर जाऊन पोचली होती. जून महिन्यात रुग्ण संख्या थोडी कमी होऊन एक हजारांवर स्थिरावली होती.

जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात देखील रुग्ण संख्या कमी होत नव्हती. आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळालेला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील तणाव देखील थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ३ हजार ७८८ इतका झालेला आहे. मेआणि जून महिन्यामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आता मात्र कोरोनाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. कर्‍हाड तालुक्यातील रुग्ण संख्या सातत्याने वाढत होती. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान ही रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आता कऱ्हाड तालुक्‍यात देखील रुग्ण संख्या कमी होताना दिसते आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातारा तालुका रूग्ण संख्येत आघाडीवर होता, आता मात्र सातारा तालुक्यात देखील रुग्ण संख्या घडताना दिसते आहे. रविवारी कऱ्हाड तालुक्‍यात १४७ तर सातारा तालुक्यात १४२ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ९१७ लोकांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. मृत्यूच्या संख्येत देखील सातारा तालुका सर्वात पुढे होता. आता या तालुक्यातील मृत्यूची संख्या कमी झाली. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या सोमवारी संध्याकाळपर्यंत १ हजार २४६ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ११ लाख ८९ हजार ५२० तपासण्या करण्यात आल्या असून २ लाख ३ हजार ७८८ रुग्ण आढळले आहेत. तर ९ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

१६.४९ वरुन ६ टक्क्यांवर घसरण

मागील आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर १६.४९ टक्क्यांवर गेला होता. आठवडाभर रुग्णवाढ कायम राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू केले. रविवारी मात्र रुग्ण वाढीचा दर ६.७ टक्क्यांवर खाली घसरल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपर्यंत जर रुग्णसंख्या वाढीचा दर तेवढाच राहिला किंवा आणखी घटला तर जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यात लागू असलेले निर्बंध हटवले जाऊ शकतात.