शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सखींसाठी आजपासून रास-दांडिया महोत्सव

By admin | Updated: September 28, 2014 00:33 IST

लकी ड्रॉ मधून दररोज दहा बक्षिसे जिंकण्याची संधी

सातारा : जिजाऊ प्रतिष्ठान आणि लोकमत सखी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील सखी मंच सदस्य, इतर महिला आणि महाविद्यालयीन युवतींसाठी रविवार, दि. २८ सप्टेंबरपासून ते १ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी साडेसहा ते साडेदहा या वेळेत अनंत इंग्लिश स्कूलमध्ये ‘रास-दांडिया २०१४’ या ‘रंगारंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.साताऱ्यातील महिला व युवती कला, क्रीडा व उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहेत. नवरात्रौत्सवात दांडिया कलेला व्यापक स्वरूप मिळावे, या उद्देश्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या दांडिया उत्सवात दररोज वेशभूषा, इनोवेटिव्ह स्टेप्स, नृत्य अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेत दररोज दहा पारितोषिके जिंकण्याची संधी सखींना मिळणार आहे. स्पर्धेच्या समारोपादिवशी ‘रास दांडिया क्विन’ला ३२ इंची एलईडी टीवी, दुसऱ्या क्रमांकाला अ‍ॅटोमेटिक आटाचक्की, तिसऱ्या क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर तर चौथ्या क्रमांकासाठी सेमी आॅटो वॉशिंग मशीन अशी एकूण दोन लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सलग तीन दिवस सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचाच शेवटच्या दिवशी देण्यात येणाऱ्या मेगा बक्षिसांसाठी विचार केला जाईल. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून, ५० रुपये शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश दिला जाईल.स्पर्धेत तसेच दांडिया खेळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सखी मंच सदस्य इतर महिला आणि महाविद्यालयीन युवती सहभागी होऊ शकतात. कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांनाही दररोज लकी ड्रॉ मधून बक्षिसे जिंकता येतील. यासाठी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणारे कूपन आवश्यक आहे. आज पहिले कूपन प्रसिद्ध करण्यात आले असून, हेच कूपन लकी ड्रॉ करिता ग्राह्य धरले जाईल.आजपासून दररोज एक अशी चार कूपन प्रसिद्ध करण्यात येतील. महोत्सवाचे उद्घाटन चेतना माजगावकर, शिवाजी खुडे, गीता मामणिया, टिना शहा, ज्योती ठक्कर, मनोज देशमुख, माधव सुर्वे यांच्या उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)