शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रंगून गेलाय वर्ग.. ‘झेडपी’चं सुटलंय वारं!

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

शाळा प्रवेशाची तयारी जय्यत : लोकप्रिय ‘सैराट झालं जी...’ गाण्याच्या चालीवर जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची जिंगल ट्यून सोशलमीडियावर लोकमत विशेष

सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. पंधरा दिवस शिल्लक असले तरी मुलांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. याच काळात जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी ‘जिंगल ट्यून’ व्हॉट्सअ‍ॅप सोशल मीडियावर फिरत आहे. ‘सैराट झालं जी...’ गाण्यांच्या चालीवरील ही ट्यून पालकांना आकर्षित करत आहे.शहरांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपुढे स्पर्धा आहे. खासगी शाळा पुरवत असलेल्या सुविधा, आकर्षक इमारती यामुळे प्राथमिक शाळांसमोर मोठी स्पर्धा असली तरी ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांची चिंता दिसत नाही.शहरी भागांच्या लगत असलेल्या गावांतील मुलं खासगी शाळांमध्ये जातात. या मुलांच्या सोयीसाठी अनेक शाळा ‘स्कूल बस’ पाठवत आहेत. त्यामुळे त्या भागातील शाळांमधील शिक्षकांसाठी मुलांना शाळेपर्यंत आणण्यासाठी धडपड करावी लागते. शाळा प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शक कृती कार्यक्रम ठरवून दिलेला आहे. अनेक शाळा व शिक्षक केवळ त्याचीच अंमलबजावणी करत असतात. त्यानुसार दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात गावामध्ये सर्व्हे केला जातो. त्यातून सहा ते सात वयोगटातील मुलांचा शोध घेतला जातो. ही यादी केंद्र प्रमुखांमार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषदेला दिली जाते. सहा वर्षांवरील मुलांच्या पालकांना शाळेत प्रवेश घेण्याबाबत सांगितले जाते. त्यातून एखादा विद्यार्थी आलाच नाही तर त्याचा पाठपुरावा घेऊन तो कोठे गेला आहे. कोणत्या शाळेत प्रवेश घेतला याची माहिती जिल्हा परिषदेला द्यावी लागते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचना केल्या जात असल्या तरी अनेक हौसी शिक्षक नवनवीन उपक्रम राबवत असतात. कोणी मुलांना गुलाबपुष्प देतात, कोण खाऊ देतात तर काहीजण त्यांची गावातून मिरवणूक काढून औक्षण करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ करतात.विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी एका निर्मिती संस्थेने जिंगल ट्यून तयार केली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून ही ट्यून बाहेर पडली अन् असंख्य शिक्षक, पालकांपर्यंत ती पोहोचत आहे. ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय असली तरी ‘सैराट झालं जी...’ हे गाणं लहान मुलांपासून सर्वांच्याच ओठांवर खेळत आहे. हाच धागा पकडून ही ट्यून बनविण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा वापरत असलेला ज्ञान रचना वाद, वस्तू-वस्तू जोडून गणित शिकवणं, मुलांना विशेष आवड निर्माण करण्यासाठी वर्गांची केली जात असलेली रंगरंगोटी आदी उपक्रमांची ओळख या ट्यूनच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)डिजिटल झेडपी गुरुजी ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांचा ‘डिजिटल झेडपी गुरुजी ग्रुप व्हॉट्सअ‍ॅपवर सक्रिय आहे. या गु्रपमधील असंख्य सदस्य हे तंत्रज्ञानाविषयी रुची बाळगून आहेत. स्मार्टफोनमध्ये नवनव्याने होत असलेले बदल, त्यामुळे होत असलेल्या गमतीजमती याद्वारे शेअर करत आहेत. त्यामुळे सर्वच गुरुजींमध्ये याविषयी आवड निर्माण होत आहे.ज्ञान रचनावाद आलं, वर्ग हे रंगून गेलं...वस्तू मोजून-मोजून, क्रियेत दंगून गेलंजिल्हा परिषद, ज्याच्या त्याच्या तोंडी हो... ई-लर्निंगचं वारं आलं जी, सैराट झालं जी...बदलून गेलंय सारं, झेडपीचं सुटलंय वारं,रचनेचं विचार आलं, प्रगत शिक्षण झालं,हो... शाळेमधी गुणवत्ता आली, हो... हातामध्ये पॅन आलं जी...सैराट झालं जी..!